Monday, November 15, 2021

दांडेली अभयारण्य माहिती

 ......दांडेली अभयारण्य.......

===========================



          दांडेली वन्यजीव अभयारण्य कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नडा जिल्ह्यामध्ये असून ८६६.४१ चौ.कि.मी.क्षेत्रफळ असलेले हे अभयारण्य कर्नाटक राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे अभयारण्य आहे.

शांत आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या या अभयारण्यात अनेक दुर्मिळ प्रजातीचे वन्यजीव आणि वनराई पाहायला मिळते.दांडेली अभयारण्य धारवाड पासून ५५ कि.मी. हुबळी पासून ७३ कि.मी. तर बेळगाव पासून ८९ कि.मी.अंतरावर आहे.

काली नदीच्या तीरावर दांडेली नावाचे दुमदार शहरवजा गाव वसलेले असून याच गावाच्या नावावरून अभयारण्यास दांडेली हे नाव पडले आहे.

या अभयारण्यामध्ये वाघ,बिबटे,काळे चित्ते,हत्ती,गवा असे अनेक वन्य प्राणी मोठ्या संख्येने पाहायला मिळतात.

दांडेली अभयारण्याचा प्रदेश सोळाव्या शतकात कित्तूर ची राणी चन्नमा हिच्या ताब्यात होता.ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली तेंव्हा त्यांनी दांडेली,कारवार हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला होता.सन १० मे १९५६ रोजी दांडेली चा परिसर दांडेली अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलातर दांडेली अभयारण्य २००७ मध्ये संरक्षित व्याघ्र प्रकल्प(Tiger reserve) म्हणून घोषित करण्यात आले.शेजारी असलेले अंशी वन्यजीव अभयारण्य व शेजारील गोवा राज्यातील महावीर अभयारण्य ही दोन्ही अभयारण्ये दांडेली अभयारण्याशी जोडली गेली.कर्नाटक शासनाने २०१५ मध्ये अधिकृतरीत्या दांडेली अभयारण्याला संरक्षित हत्ती रिजर्व(Elephant reserave) म्हणून घोषित केले. 

काली नदी आणि तिची उपनदी नागजीरी नदी या दोन नद्या दांडेली अभयारण्यातील पाण्याचे मुख्य स्त्रोत आहेत.

दांडेली अभयारण्य वन्यप्राण्यांच्या बाबतीत संपन्न आहे.इथे आढळणारी वन्यप्राण्यांची विविधता भारतातील फार कमी अभयारण्यामध्ये पाहायला मिळते.पश्चिम घाटामध्ये हे अभयारण्य असल्याने वन्यप्राण्यांना नैसर्गिक अधिवास  मिळतो.

S@chin 👍

दांडेली अभयारण्या मध्ये हरणाचे काही प्रकार,गवा,अस्वल,उडणारी शेकरू खार,वाघ,बिबट्या,काळा बिबट्या,हत्ती,माकडाच्या प्रजाती तसेच सरपटनाऱ्या जीवांमध्ये अजगर,किंग कोब्रा,मण्यार,धामण,घोणस,मलबार पिट वायपर तसेच इतर विषारी व बिनविषारी सर्प आढळतात.त्याच बरोबर मगरी,सुसरी,घोरपड इत्यादी सरपटणारे जीव या अभयारण्यात आढळतात.

दांडेली अभयारण्य पक्षी निरीक्षणासाठी आदर्श मानले जाते कारण या अभयारण्यात २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात.भारतातील प्रमुख पक्षी निरीक्षण क्षेत्रात दांडेली अभयारण्याचा समावेश होतो.

दांडेली अभयारण्यात सफारी करणे हा अभयारण्य जवळून अनुभवण्याचा प्रकार आहे.जे पर्यटक दांडेली ला जातात ते अभयारण्य सफारी जरूर करतात.सफारी मुळे वन्यप्राणी व वनस्पतींची जवळून ओळख होते.

वेळ:
सकाळी ५.३० ते सकाळी ९.००

दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.००

शुल्क:

४५० रुपये प्रति माणशी (भारतीय पर्यटक)

१२०० रुपये प्रति माणशी (विदेशी पर्यटक)

दांडेली अभयारण्या पासून १४ कि.मी.अंतरावरील कुलगी नेचर कॅम्प पर्यटक आवर्जून पाहतात,कारण या ठिकाणी एक संग्रहालय असून त्यामध्ये दांडेली अभयारण्या बाबतची सर्व माहिती प्रदर्शित केली आहे.तसेच या अभयारण्यात १३ फुट लांबीचा नागराज (किंग कोब्रा) जो या परिसरात मृत अवस्थेत सापडला,तो जतन करून ठेवला आहे.या कॅम्प मध्ये तंबू मध्ये मुक्काम करण्याची सोय उपलब्ध आहे.

दांडेली अभयारण्यामध्ये ३१ कि.मी.आत घनदाट जंगलात असलेल्या कनारी नदीच्या पात्रात पाण्याच्या प्रवाहामुळे व क्षरणा मुळे ३०० फुट उंचीची खडकाची विशीष्ट प्रकारची रचना तयार झाली आहे.या चित्रविचित्र दिसणाऱ्या रचनेस मोनोलीथिक रचना असेही म्हणतात.सिंथेरा नावाच्या ब्रिटीश महिलेने या संरचनेचा शोध लावल्याने तिचे नाव देण्यात आले.या स्थळापर्यंत वाहन जाते व १० ते १५ मिनिटे पायी चालावे लागते.

जर तुम्ही दांडेली अभयारण्य सफारी करण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल? तर तुम्हाला सांगतो की,ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी दांडेली अभयारण्यामध्ये सफारी करण्यासाठी उत्तम असतो.या काळात वन्य प्राण्यांचे दर्शन होण्याची शक्यता जास्त असते,तसेच वातावरण सुखद असते व जंगल हिरवेगार असते.पावसाळ्यामध्ये हे अभयारण्य सफारीसाठी बंद असते.


मोठ्या संख्येने पर्यटक या अभयारण्याला भेट देण्यासाठी येतात.जंगलाच्या वातावरणात राहण्यासाठी अनेक हॉटेल्स,लॉज व रिसोर्ट उपलब्ध असून लो-बजेट पासून हाय-बजेट पर्यंत सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी आहेत.तसेच काही रिसोर्ट तंबूवजा खोल्या उपलब्ध करते ज्यामध्ये सर्व सोयी असतात.माहिती साठी दांडेली मधील काही हॉटेल्स/रिसोर्ट पुढीलप्रमाणे


👉दांडेली क्रोकोडाईल एज होम स्टे


👉 दांडेली जंग


👉 दांडेली स्टे श्री


👉 दांडेली विसल्स वूड


+919902474761 अधिक माहितीसाठी या नंबरवर फोन करू शकता...