❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄
भूतान माहिती
==========================
एका सुंदर देशाची अविस्मरणीय अशी सहल मागील वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी सहकुटुंब दहा दिवसांची सहल पूर्ण केली खरंतर हिमालय आणि ईशान्य भारत हे माझे नेहमीचे आवडीचे ठिकाण !!यावर्षी भुतान या देशामध्ये प्रवास करण्याचे नियोजन केले.
अनेक ठिकाणी चौकशी केली. वैयक्तिक आयोजन करुन जाण्याचा माणस होता परंतु काही बाबींमुळे पुण्यातील एका ट्रॅव्हल कंपनीमार्फत भूतानला जाण्यासाठी मी नाव नोंदणी केली .
एका ग्रुप सोबत आम्ही भूतान या देशांमध्ये सहल करण्यासाठी गेलो.
पुण्याहून आम्ही ट्रेनने कलकत्ता येथे गेलो व तेथून रात्री न्यू-जल-पैगुडी ठिकाणी पोहोचलो .
त्यानंतर फुन्सालिंग या भूतान मधील सर्वात पहिल्या गावांमध्ये पोहोचलो.
प्रवेश केल्या क्षणी आपण वेगळ्या देशामध्ये आलो आहोत याची जाणीव झाली. सुंदर इमारती छोट्या स्वरूपात प्रत्येक घरापुढे असलेल्या बागबगीचा आणि कमालीची स्वच्छता यामुळे भूतानचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या या गावामध्येमध्ये खूप आनंद वाटला.
या ठिकाणी भारत आणि भूतान यांच्या दरम्यान फक्त एक तार कंपाउंड आहे भारतामधील लोक रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी मुख्य दरवाजातून भूतानमध्ये ये जा करत असतात. या देशांमध्ये फिरण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम परमिट किंवा व्हिसा ची आवश्यकता असते. जो तिथे गेल्यानंतर आपल्याला मिळतो. तो मिळाल्यानंतर आम्ही स्थानिक सर्व स्थळदर्शन केलं आणि पहिला मुक्काम त्याच ठिकाणी केला.
दुसऱ्या दिवशी तेथील स्थानिक ट्रॅव्हल एजंट मार्फत आम्ही पुढील प्रवास सुरु केला. त्यानंतर आम्ही भूतान देशाची राजधानी थिंपू या शहरांमध्ये पोहोचलो. अत्यंत सुंदर असे राजधानीचे शहर थिंपू आहे .विशेष म्हणजे संपूर्ण देशामध्ये कुठेही वाहतुकीचा सिग्नल नाही दुचाकी खूप कमी प्रमाणात आहेत .गरजेचेच वेळेस चार चाकी रस्त्यावर येतात अन्यथा संपूर्ण देशामध्ये पर्यटकांच्या गाड्या सोडून स्थानिक लोक फार कमी प्रमाणात दळणवळण करतात. जगातील सर्वात आनंदी देश म्हणून या देशाची ओळख आहे.संपूर्ण देशाची लोकसंख्या ही आपल्याकडील एखाद्या मोठ्या शहराच्या लोकसंख्येएवढी आहे .
अत्यंत सुंदर असे नयनरम्य चित्र संपूर्ण देशामध्ये आपल्याला दिसून येतं .
थिंपू मध्ये पाहण्यासाठी मॉनेस्ट्री संग्रहालय ,जोंग पॅलेस ,मोती टाँग्ज ,तसेच टाकीन या प्राण्यांसाठी प्रसिद्ध असणारे प्राणी संग्रहालय आहे.
त्याचप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात तिबेटियन वस्तू मिळण्याचे हँडीक्राफ्ट मार्केट प्रसिद्ध आहे .येथे दोन दिवस राहिल्यानंतर आम्ही पुढील ठिकाणी म्हणजे पुनाखा या ठिकाणी गेलो. विविध प्रकारचे बौद्ध धर्मीय प्रार्थना स्थळे आणि तेथील आल्हाददायक हवामान यामुळे मुक्काम खूपच छान वाटला त्यानंतर आम्ही पारू या ठिकाणी आलो .या देशांमधील एकमेव विमानतळ इथे आहे तसेच सांग मॉनेस्ट्री ,नॅशनल म्युझियम ,हिस्टरी हे देखील येथे पाहण्यासारखे आहे .
या देशातील सर्वात आकर्षक ठिकाण म्हणजे या देशाच्या राजांचा राजवाडा म्हणजेच पॅलेस !!
अत्यंत सुंदर आणि देखणी अशी ही अतिभव्य वास्तू आहे. सायंकाळी पाचनंतर येथे प्रवेश मिळतो रात्री संपूर्ण राजवाड्यावर ती विद्युत रोषणाई केलेली असते ती खूप पाहण्यासारखी आहे. त्याचप्रमाणे इथे इथले दुसरे आकर्षण म्हणजे उंच पर्वतावरील *टायगर नेस्ट मॉनेस्ट्री* एक दिवसाचा ट्रेक खरोखर अविस्मरणीय असा आहे .जंगलातून सुमारे 14 किलोमीटरचा हा पर्वत प्रवास आपल्या ट्रीपचे सार्थक लावणार आहे .जर आपण या देशाला भेट द्या देणार असाल तर टायगर मॉनेस्ट्री हे ठिकाण कदापि चुकवू नका. चढण्यासाठी अवघड आहे परंतु नजरेचे पारणे फेडणारे आहे त्यामुळे आपण या देशांमध्ये जर जाणार असाल तर पूर्वनियोजन करून जावे. धन्यवाद.......
🐋🐋🐋🐳🐳🐳
प्रति व्यक्ती ..........
३४ हजार रुपये
सर्वखर्चासह
प्रवास
निवास ९ मुक्काम
गाईड
भारतीय भोजन
एन्ट्री फी





































