❄❄❄❄❄❄❄❄❄❄
श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट.
===============================
एका रविवारी सहज अक्कलकोटला जायचे असे ठरले। तसे तर अक्कलकोट ला आगोदर गेलो होतो , पण गेल्या 6 वर्षात नाही।
बार्शी पासून हे आंतर 120 किमी आहे। सकाळी साधारण 10 च्या आसपास निघालो। चार तासानी मंदिरात पोहचलो। हे मंदिर खूप छान आहे।जुना वाडा पद्धती मध्ये मोडते। जातानाच उजव्या हाताला ताक मिळते ते प्यायलो।
आत जाताच वटवृक्ष खाली स्वामींचे पादुका मंदिर आहे . त्यानंतर आपण स्वामींच्या समाधीकडे जातो . तेथील दर्शन घेऊन स्वामींनी वापरलेला झोपाळा पाहतो . व बाहेर पडतो . दर्शनानाने मन शांत होते .
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे .
याची खरच प्रचिती येते .
जाताना वाटेत कुंभारी ग्रामदेवतेचे मंदिर आहे . हे मंदिर पाहताच आपण दाक्षिणात्य मंदिरासमोर आहोत असा भास होतो . या मंदिराची कमान संपुर्ण संगमरवरी आहे . खूप स्वच्छता आहे . जरूर पहावे असे मंदिर .
आख्यायीका:
स्वामी समर्थांचे अक्कलकोटला बावीस वर्ष वास्तव्य होते.अक्कलकोट शहर कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असून सोलापूर जिल्ह्यात येते.सन १८५६ साली स्वामी समर्थांचे अक्कलकोटला आगमन झाले.तर सन १८७८ साली त्यांनी अक्कलकोटला समाधी घेतली.श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत.महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक चमत्कार केले.''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.'' असे स्वामींचे भक्तांना अभिवचन होते.
श्री दत्तात्रेयांचे कलियुगातील दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती हे शके १४४० मध्ये श्रीशैल्य पर्वतावर कर्दळीवनात गुप्त झाले. तेथे निबिड अरण्यात एका प्रशस्त ठिकाणी त्यांनी समाधीच्या स्थितीत राहण्याचे ठरविले. नीरव शांतता, उंचच उंच वृक्ष असलेल्या ठिकाणी एका पहाडाच्या कोपऱ्यात एक गुहा होती. त्या गुहेला लागून वटवृक्ष, औदुंबर आणि अश्वत्थ हे तिन्ही वृक्ष एकत्र वाढलेले होते. त्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून ध्यानस्थ बसले. असे म्हणतात की एक, दोन, दहा, वीस अशी ३५० हून अधिक वर्षे ते तेथे समाधी अवस्थेत बसून होते. त्यांच्या आजूबाजूला जंगल वाढले होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीराभोवतीही एक प्रचंड मोठे वारूळ तयार झाले होते. ते वारूळ त्यांच्या मस्तकाहूनही ८ ते १० फूट उंच झाले होते. वारुळामध्ये नागांचा मुक्त संचार होत होता. काळाच्या ओघात गुहेभोवती पडझड होऊन श्री नृसिंह सरस्वती जेथे समाधीमध्ये बसले होते ते ठिकाण औदुंबर, वटवृक्ष आणि अश्वत्थ वृक्षाच्या जवळ आले होते. एके दिवशी एक चेंचू आदिवासी लाकूड तोडण्यासाठी त्या घनदाट जंगलात भटकत होता. भटकता भटकता जेथे श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून बसले होते तेथे आला आणि तेथील वृक्षावर त्याने घाव घातला. तो घाव चुकून त्या वारुळावर बसला आणि समाधी स्थितीत बसलेल्या श्री नृसिंहसरस्वतींच्या मांडीपर्यंत पोहोचला. तेथून भळाभळा रक्त वाहू लागले. श्री नृसिंह सरस्वतींची शेकडो वर्षांची समाधी त्यामुळे भंगली आणि ते त्या वारुळातून बाहेर पडले. श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे त्या वेळचे रूप विलक्षण होते. ते दाशरथी राजाप्रमाणे आजानुबाहू होते. त्यांचे हात गुडघ्यापेक्षाही खालपर्यंत होते. उंची सहा फुटांपेक्षा जास्त, विशाल छाती, रुंद खांदे, उगवत्या सूर्याप्रमाणे तेजस्वी अंगकांती, केळीच्या गाभांसारखे पाय, टोकदार नाक, भव्य कान आणि त्यातील तेजस्वी कुंडले, अत्यंत भेदक दृष्टी आणि कमळासारखे डोळे. हा प्रकार पाहून तो आदिवासी घाबरला आणि रडवेला होऊन पुन्हा पुन्हा क्षमा मागू लागला. स्वामींनी त्याला अभयदान दिले आणि तेथून ते बाहेर पडले. हेच श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार अक्कलकोट श्री स्वामी समर्थ असे मानतात. अशा प्रकारे कर्दळीवन हे स्वामी समर्थाचे प्रकट स्थान असून श्रीदत्तात्रेयांचे गुप्त स्थान आहे, असे मानले जाते.
🐋🐋🐋🐳🐳🐳