Saturday, December 21, 2019

छाया सोमेश्वर मंदिर,नालगोंडा,तेलंगणा

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

                          रहस्य भाग 2
           छाया सोमेश्वर मंदिर,नालगोंडा,तेलंगणा।
===+====+====+====+=======+====
या दुसऱ्या भागात मी तुम्हांला तेलंगणा राज्यातील नालगोंडा येथील छाया सोमेश्वर मंदिर येथे नेणार आहे।
        नावाप्रमाणेच हे मंदिर भगवान महादेवाचे आहे। याची आख्यायिका मध्ये एकदा भगवान शंकर व देवी पार्वती मध्ये खूप जोराचे भांडण झाले। त्यामुळे भगवान कैलाश पर्वत सोडून नालगोंडा येथे आले। थोड्या वेळाने देवी पार्वती त्यांना शोधत शोधत येथे आली। मग भगवान शंकरानी तिला आपल्या मागे सावली म्हणून जागा दिली।
          या मंदिरात देवी पार्वती सावलीच्या रुपात भगवान महादेव सोबत आहे। दिवसभर या पिंडीची सावली मागे भिंतीवर बरोबर मध्ये असते। आता तुम्ही म्हणाल की एखादा खांब मध्ये येत असेल की!
            मग ही आख्यायिका तयारच झाली नसती। देवाची मुर्ती व सूर्यप्रकाश मध्ये कोणताही खांब नाही। तरीपण ही मुर्ती ची सावली आहे। या मूर्तीच्या गाभारा मध्ये कायम अंधार असतो। त्यामुळे ही सावली स्पष्ट दिसते।तसेच ती सावली दिवसभर हलत नाही, हेही आजून एक वैशिष्ट्य!!!
           आता काहीजण दर्शन मंडप मधील प्रत्येक खांबाजवळ जाऊन आपली सावली आत येते का ते तपासून पाहतात। पण ती सर्व मेहनत वाया जाते। हे मंदिर साधारण 800 वर्ष्या पूर्वी बांधलेले आहे। हे बांधकाम चोल साम्राज्यात झालेची नोंद आढळते। मग 800 वर्षेपूर्वी हा चमत्कार कसा काय घडू शकतो। त्यावेळचे बांधकाम शास्त्र आजच्या पेक्ष्या प्रगत होते काय??
       उत्तर आहे हो नक्की ते प्रगत होते। कारण येथे जरी आख्यायिका असली तरी त्यामागे नक्की विज्ञान होते।त्यावेळी असलेले लोक प्रगत होते। फक्त त्यांचे ज्ञान आपल्या पर्यत पोचले नाही, हीच खरी शोकांतिका!!!
                  या सावलीचे रहस्य शोधून काढले होते ते भौतिक शास्त्रज्ञ मनोहर शेषगिरी यांनी। या सावलीसाठी एकूण चार खांब जबाबदार आहेत।
         यांनी सावली साठी दोन प्रकार मानले आहेत। पहिला प्रकार सरळ सूर्यप्रकाश एखाद्या वस्तूवर पडला असता तयार होणारी छाया । ही छाया हलणारी असते। हलणारी म्हणजे जसा सूर्य आपली जागा बदलेल तशी सावली पण आपली जागा बदलते। सकाळी सावली पश्चिम दिशेला असेल तर संध्याकाळी सावली पूर्व दिशेला।
          दुसरी छाया ही सूर्यप्रकाश च्या विकिरणा ने पडते। पण ही सावली आपली जागा बदलत नाही। कारण सूर्यप्रकाश किरण सरळ वस्तू ला अडत नाहीत। तर त्यांचे विकिरण होते। मगच वस्तू ला अडून त्याची छाया निर्मिती होते। सावली तयार होते। मग सूर्य कोणत्याही दिशेला असो। वस्तू ची छाया जागची हलत नाही। हाच धागा पकडून याची उकल झाली आहे।

मी घरी काढलेली आकृती। शास्त्रज्ञ मनोहर यांनी ही सुचवलेली आहे। मी फक्त drawing काम केले।


वरील आकृतीत मोठे ठिपके हे मंदिरातील खांब आहेत। पहिला किरणचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, सर्वात कडेच्या खांबांची सावली आतील दोन खांबावर पडते। आणि त्या दोन खांबांची बरोबर मध्ये गाभाऱ्यात पडते। अश्या प्रकारे पहिली सावली तयार होते। आता दुसरा किरणा मुळे एक खांबांची सावली शेवटच्या खांबावर पडते। त्याची सावली गाभाऱ्यात पडते।  अश्याप्रकारे ती सावली दोन वेगवेगळ्या खांबांची आहे।आपण ज्यावेळी एक खांबाचा विचार करून सावली अडविण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी दुसऱ्या खांब आपले काम चोख बजावतो। व सावली जशी आहे तशीच राहते।
               आता शेवटचा प्रश्न ही सावली नाहीशी कशी होईल?? याची उत्तर वरील आकृतीतच आहे। आपल्याला ते दोन किरण बंद करावे लागतील। म्हणजे सावली नाहीशी होईल।
                 आता मंदिर कडे जाऊ। आपल्याला ते दोन किरण व तो खांब पहावा लागेल।






वरील दोन फोटोत आपल्याला ते दोन खांब व आत येणार प्रकाश दिसेल।आत कशी सावली आहे ते पाहू।

प्रकाश आत आला की सावली नाही दिसत।


मुख्य गाभारा असा दिसतो।


सावली अशी दिसते। जी कधीही बदलत नाही।




वरील तीन फोटोत मुख्य गाभारा , प्रकाश आत आला की नाहीशी होणारी सावली , सावली कशी आहे हे दिसतें।
               आपल्या पूर्वजाना प्रकाशाचे विकिरण 800 वर्ष आगोदर माहीत होते। हा त्याचा पुरावा। किती प्रगत स्थापत्यशास्त्र शास्त्र होते ते !!!

मुख्य मंदिर

आतील सावली अशी छान आहे।

🐋🐋🐋🐋🐳🐳🐳🐳

Saturday, November 30, 2019

भगवान दत्तात्रेय मंदिर,काला डुंगर,कच्छ, गुजरात।

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

                      रहस्य भाग 1

---------------------------------------------------  भगवान दत्तात्रेय मंदिर,काला डुंगर,कच्छ, गुजरात।
======+=+=====××××+==========                 

                       रहस्य भाग 1 हे सदर मी आजपासून लिहण्यास सुरुवात करतो आहे। आपण आपली प्रतिक्रिया नक्की सांगाल ही अपेक्षा व्यक्त करतो।
         गुजरात हे एक संपन्न राज्य आहे। तिथे बनवलेला statue of unity पाहायला आपण नक्की जात असतो।सुरत , बडोदा, अलाहाबाद ही आपली आवडीची ठिकाणे। आता एका नवीन ठिकाणाची त्यात भर घालायला तयार रहा।
         कच्छ हे वाळवंट पाहण्यासाठी काही निवडक पर्यटक जातात। कारण त्यांना काला डुंगर हा पर्वत व तेथील भगवान दत्तात्रेय मंदिर हे माहिती असते। साधारण कच्छ पासून 25 किमी दूर काला डुंगर हा पर्वत  आहे। या पर्वतावरून कच्छ वाळवंट हे विलोभनीय दिसते। या पर्वताच्या माथ्यावर आपले दत्त मंदिर आहे। या मंदिरापर्यंत आपली कार जाते, पण रस्ता अरुंद आहे। जाताना निसर्गाचा आनंद घ्यायला विसरायचं नाही। कारण हाच काय तो हिरवा भाग।
        कार पार्किंग ला लावल्यावर थोड्या पायऱ्या चढल्या की मंदिराचे दर्शन होते। मंदिरात जाण्यासाठी थोड्या पायऱ्या चढून जाव्या लागतील। प्रथम तुम्हाला सभामंडप चे दर्शन होईल। मग मुख्य गाभारा पाहायला मिळेल। तसे हे मंदिर 400 वर्ष जुने आहे ,असे म्हणतात। पण येथील रचना पहिल्या वर तो एक प्रश्न निर्माण करतो। गाभारा हा नवीन पध्दतीच्या सिमेंट कॉलम वर उभा आहे। छताला फारशी कलाकृती नाही। अगदी साधा आहे। खाली छान फारशी आहे । कदाचित ती संगमरवरी असावी।मुख्य गाभारा पण अगदी साधा असाच आहे। असे हे मंदिर। पण हे विश्व प्रसिद्ध आहे हे मात्र नक्की। गुजरात ला भेट देणारे कोणतेही परकीय या मंदिराला नक्की भेटी देतात। जवळच एक सन सेट पॉईंट आहे। हे कच्छ मधील सर्वात उंच पॉईंट आहे। याची उंची 458 मीटर आहे। येथूनच दिसणाऱ्या सूर्यास्त चे शब्दांत करणे जवळजवळ अशक्य आहे। खूप विलोभनीय, सुंदर, मनमोहक, मन प्रसन्न होणारे असते ।
              या मंदिराला भेट देण्याचे हे एकच कारण नाही। दुसरे महत्त्वाचे कारण आहे ,येथील लांडगे। जे तुम्हाला दिवस भरात कोठेही दिसणार नाहीत। अगदी हा काला डुंगर सगळा जरी पालथा घातला तरी! हे या मंदिराकडे दिवसातून फक्त दोनदा येतात। तेही प्रसाद घ्यायला!
       आता तुम्हाला वाटेल , की मांसाहारी प्रसाद असल्यावर ते येणारच। पण हा मांसाहारी नाही तर चक्क शाकाहारी आहे। तेही फोडणीचा भात ! मग लांडगे काय खाणार ?  खाणारच आणि त्यांनी खाईपर्यंत इतर कोणही खाणार नाहीत। अगदी मांजर, कावळे, इतर पक्षी सुद्धा नाही बरं!! त्यांचे झाल्यावर इतरांना परवानगी मिळते। आता तुम्ही म्हणाल हे खोटे आहे। नाही तर खरे आहे। हेच पाहण्यासाठी परदेशी पर्यटक येतात। त्यामुळेच हे मंदिर जगप्रसिध्द झाले आहे। आणि हे काम आजपासून नाहीतर मागील 500 वर्षांपासून अविरत चालू आहे। हेच पाहण्यासाठी आपल्याला तिकडे जायचे आहे।
          दुपारी व संध्याकाळी आरती झाल्यानंतर पुजारी ताटात खिचडी घेऊन लोंग प्रसाद ओटलो या चबूतऱ्यावर जातात। तिथे ती खिचडी ठेवतात। मग हातातलं ताट वाजवत मंदिराकडे येतात। पण येताना मोठमोठ्या ने म्हणतात लो अंग,  लो अंग। या वरूनच त्या चबुतऱ्या चे नाव लोंग प्रसाद ओटलो असे पडले आहे। मग कुत्री, कावळे, चिमणी, मांजर व इतर पक्षी येतात, पण ते त्या खिचडी ला आधी कधीच तोंड लावत नाहीत। थोडा वेळ होताच लांडगे येतात। ती खिचडी खातात। खाताने ते कधिच भांडण करत नाहीत। अगदी शांत पणे खातात। निघून जातात। साधारण पणे त्याची संख्या 40 च्या आसपास असते। मग इतर त्यावर तुटून पडतात। या लांडग्यांनि आजपर्यंत एकाही मनुष्य प्राण्यावर हल्ला केला नाही, हे विशेष। हे आपल्याला अर्थात लांबूनच पाहावे लागते।
             याची आख्यायिका अशी आहे....
    ज्यावेळी भगवान ध्यान लावून बसले होते। त्यावेळी तिथे एक लांडग्यांचा कळप आला होता। तो कळप खूप दिवसापासून उपाशी पोटी होता। जणू काही भगवान दत्तात्रय याची परीक्षा पाहत होता, की आम्हाला वाचवा। मग भगवान यांनी स्वतः शरीरातील मांस कापून त्यांच्यापुढे टाकले।त्यांनीही आवडीने खाल्ले। पण काय आश्चर्य त्याजागी कापलं तिथे नवीन मांस तयार !!! हे रुटीन पुढे बरेच दिवस चालले। आता भगवान तेथून जाणार होते। त्यामुळे त्यांनी एकेदिवशी खिचडी दिली। त्यांनीही आनंदाने खाल्ली। तेव्हा पासून ही परंपरा चालू आहे।

        याठिकाणी येण्याची आणखी काही कारणे.......
1.  भगवान दत्तात्रय यांचे मंदिर आहे। असे म्हणतात स्वतः भगवान दत्तात्रय यांनी इथे वास केलेला आहे।

2. येथील सन सेट पॉइंट होय। कच्छ मधील सर्वात उंच पॉईंट आहे। येथून भारतातील शेवटचा पूल दिसतो।

3. येथून बॉर्डर खूप जवळ आहे। फक्त 70 किमी। येथील दुर्बिणीतून पाहू शकता।

4. दुपारी व संध्याकाळी लांडगे खिचडी खाताना पाहणे अतिशय रोमांचक प्रसंग।

5. आजून एक महत्वाचे, येथील मॅग्नेटिक फील्ड । याठिकाणी आल्यावर याचा अनुभव घ्यायला विसारचे नाही। पर्वत चढताना एका विशिष्ट ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड लागते। त्याठिकाणी आपली कार बंद करायची व आश्चर्य पहायचे। तुमची कार पर्वत चढू लागेल। ते गुरुत्वाकर्षण नियमाच्या विरोधात!!! तेही 20 च्या स्पीड ने। विश्वास नाही, मग स्वतः अनुभव घ्या।

6. शेवटचं .....
      हे आपल्या भारतातील एकमेव ठिकाण आहे जेथून आपण चार बाबी पाहू शकता।
1. जंगल
2. पर्वत
3. वाळवंट
4. आणि समुद्र।

🐋🐋🐋🐳🐳🐳


भगवान दत्तात्रेय मंदिर, काला डुंगर।

खिचडी खाताना लांडगे।

खिचडी ठेवल्यावर पुजारी असे ताट वाजवतात, लो अंग लो अंग असे म्हणतात।

भगवान दत्तात्रेय मूर्ती।

Sunset point. It is about 548 mtrs high from sea level.. highest point in Kutch.

लांडग्यांच्या प्रतीक्षेत इतर 
Image source::: Google photo...

Wednesday, November 20, 2019

वालुकाशिल्प संग्रहालय, मैसूर।

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

            वालुकाशिल्प संग्रहालय, मैसूर।   
            ===++====+======+==============

                      मैसूर शहर हे संग्रहालय शहर म्हणून प्रसिध्द आहे, हे आधीच सांगितले आहे।
     येथे कोण कोणत्या गोष्टीचं संग्रहालय करेल याचा काही नेम नाही। अंदाज तर अजिबात येत नाही।
           आम्ही अगोदरच सी शेल संग्रहालय पाहिले होते। त्यानंतर खूप भूक लागली होती।जवळच हॉटेल असेल तर बरं होईल असे मनातल्या मनात मी म्हंटलं होतं। आणि झालेही तसेच रस्त्याच्या उजव्या बाजूस राधाकृष्ण हॉटेल होते। जरा बरे दिसत होते। बायकोला ते काही आवडले नव्हते। पण आजून शोधा शोध करायची म्हंटले तर एखादा तास नक्की जात होता। नंतर परत इथे यायचे होते। मग जाऊ द्या, म्हणून परवानगी मिळाली। आत गेलो तर बैठक व्यवस्था चांगली होती। फुल्ल थाळी ऑर्डर केली। जेवण बर होतं। बाकी काही खास चव वगैरे असं काही नव्हते। पण आमचा जवळजवळ दिड तास वाचला, याचे जास्त समाधान होते।
         गाडी त्याच पार्किंगला ठेऊन आम्ही चालत वालुकाशिल्प संग्रहालयकडे निघालो। आधीचे संग्रहालय डाव्या बाजूस व आताचे उजव्या बाजूस होते। अंतर फक्त चालत पाच मिनिटं!
              गेल्या गेल्या प्रथम तिकीट खिडकीत तिकीट काढले। तिकीट जास्त नव्हते। प्रौढ 40 रुपये, लहान 20 रुपये।
           आत गेल्यागेल्या प्रथम पाहायला मिळालं ती गणपतीची मुर्ती। तीही 15 फूट उंचीची। वाळू पासून तयार केलेली। अतिशय मनमोहक , सुंदर, विलोभनीय, शांत होती। मन प्रसन्न झाले। नाही म्हंटले तर सुरुवातिला चाळीस रुपये तिकीट जास्तच वाटले होते। पण ही मूर्ती पाहताच ते आठवलं पण नाही। मग एकेक शिल्प पाहताना दोन तास कसे गेले ते कळले सुद्धा नाही।
             यालाच चिटकून देवीचे शिल्प अजूनही लक्षात आहे। अगदी जशीच्या तशी मूर्ती! त्याच्या शेजारीच वाडीयार राजाचे शिल्प। राजा हत्तीवर आंबरीत आहे, असे शिल्प आहे। हत्ती अगदी हुबेहूब होता। त्यानंतर कृष्ण व अर्जुन यांचे शिल्प होते। यात असलेला रथ नक्की कॉपी केली की काय !इतका हुबेहूब। या शिल्पातील घोडे असे होते, जणूकाही मी खऱ्या घोड्यापुढे उभा आहे। तीच उंची, तोच रुबाब, तीच स्टाईल। पुढे मग सांता क्लोज, भगवान बुद्ध यांची शिल्प होते। त्यानंतर इजिप्त देशातील शिल्पे होती। उंट, ममी , घोडे स्वार पाहुन डोळे तृप्त झाले। आजून एक वैशिष्ट्य, तिथे एक राशी चक्र पण काढलेले होते। तेही सर्व राशी चिन्हां सहित! मग अरेबियन नाईट मधील प्रसंग होते। टॉम आणि जेरी पण होता। पाण्यातील जीव, सागरी जीव पण होते। हे सगळे पाहून मन हर्षुन गेले।
       मग थोडीशी चौकशी करावी वाटली। त्यावेळी हे संग्रहालय समजून घेतले। हे संग्रहालय साधारण 14000 Sq ft. म्हणजे चौदा गुंठे जागेवर आहे। यात 130 पेक्षा जास्त शिल्पे कोरलेली आहेत। याच्या एकूण 15 ते 17 थीम होतात।
                 यासाठी एकूण 120 ट्रक वाळू लागली। यासाठी वाळू, पाणी आणि अतिशय कमी प्रमाणात डिंक यांचा वापर केला आहे। या संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे ही शिल्पे पाणी आणि प्रखर सूर्यप्रकाश यापासून सुरक्षित केलेली आहेत।तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्या, किडे लागु नयेत म्हणून यावर कीड नाशक फवारणी करतात।
          या संग्रहालयाची संकल्पना गौरी मॅडम याची आहे। त्या देशातील अग्रगण्य वालुकाशिल्पकार आहेत। हे संग्रहालय म्हणजे त्याच्या सहा महिन्यांचे अपार कष्टाचे द्योतक आहे। हे संग्रहालय आठवड्यातील सर्व दिवस 9 ते 6 वाजेपर्यंत खुले असते।

🐋🐋🐋🐳🐳🐳









              

Friday, November 15, 2019

अंदमान-निकोबार येथे कायकाय पहाल ?

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

 ★★अंदमान-निकोबार येथे कायकाय पहाल ?★★

====+====+===================+=



                काल माझ्या ग्रुप वर अंदमान-निकोबार ट्रीप कशी करावी? यासंदर्भात विचारणा झाली। यासाठी हा लेखन प्रपंच......!
        आता या ट्रिपला जायचं म्हटलं की, सर्वप्रथम प्रश्न पडतो जाणार कसं ? 
                 यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत।  प्रथम मार्ग सागरी जलप्रवास। दुसरा मार्ग हवाईमार्ग।
               मुंबईतून प्रथम रेल्वेने चेन्नई येथे जावे लागेल । तेथून मग तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांच्या क्रुज मिळतील। त्यातून तुम्ही 70 तासात पोर्ट ब्लेअरला पोचू शकता । हा झाला समुद्री मार्ग ।
            आता हवाईमार्ग पाहू । आपल्याला मुंबईतून गो एअर व इंडिगो या दोन कंपन्या स्वस्तात नेऊ शकतात। साधारण जाण्याचे तिकीट आठ ते नऊ हजार दरम्यान असेल ।येण्याचे पण तेवढेच असेल।  मुंबईहून विमानाने निघाला तर सहा ते सात तासांमध्ये पोर्टब्लेअर पोचू शकतात। आपण आधीच ऑनलाईन बुकिंग केलेले असेल तर,  सरळ मुक्कामाला हॉटेलमध्ये जावे।
                दुसऱ्या दिवशी सकाळी प्रथम आपणास सेल्युलर जेल पाहायला जायचे आहे ।  1857 च्या उठावा नंतर इंग्रजांनी ही सेल्युलर जेल तयार केली। येथे ठेवण्यात येणाऱ्या कैद्यांना ही काळ्यापाण्याची शिक्षा होती।  कारण चारही बाजूंनी समुद्राने वेढलेली जागा...!   
            ज्यावेळी इमारत तयार केली गेली, त्या वेळेला सात वेगवेगळ्या इमारती होत्या। तसेच 696 सेल होते। स्वातंत्र्यानंतर फक्त आता तीन इमारती दिसतात।  इथे प्रत्येक कैद्याला पौंड 30 नारळाची किंवा मोहरीचे तेल काढावे लागत असे।  नाहीतर अमानुष मारहाण होत असे। ही इमारत तयार करायला त्यावेळी पाच लक्ष रुपये लागले होते ।या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर शेवटची कोठडी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आहे। तसेच तुम्ही कैद्यांना फाशी देण्याची जागा पण येथे पाहू शकता।येथील संग्रहालयात तो कोलहू, इतर त्रास देण्याची शस्त्रे पाहू शकता। अश्या प्रकारे आपण वेगवेगळ्या आठवणी मनात घेऊन बाहेर पडतो। या ठिकाणी आपल्याला संध्याकाळी 6:00 वाजता यायचे आहे। इथे एक साऊंड अँड लाईट शो आहे।याचे तिकीट50 रुपये आहे। 6 व 7:30 असे दोन शो असतात। एक हिंदी तुन व दुसरा इंग्रजी तुन असतो।ते पाहून मन तृप्त होईल।
        यानंतर आपल्याला अंथरपोलॉजीकल संग्रहालय पहायला जायचे आहे । हे संग्रहालय इथल्या वेगवेगळ्या जमातीच्या इतिहासाशी निगडित आहे। हे संग्रहालय 1975 साली सुरू झाले। येथे तत्कालीन जमातीचे कपडे, शस्त्र, कला, इतर कृती पाहायला मिळतात। एकदा आवर्जून भेट द्यावी असे ठिकाण...!
         या नंतर सागरी जीवजंतू ची माहिती देणारे सामुद्रिका संग्रहालय पहायचे आहे। वेगवेगळे सागरी जीव पाहुन मन खूश होऊन जाईल। त्यानंतर इथे एक अंदमान जमती ची माहिती देणारा एक शो आहे । तो पण पाहू शकता।
              या नंतर तुम्ही आजून एक संग्रहालय पाहू शकता। झुओलॉगिकल संग्रहालय होय। येथे तुम्ही वेगवेगळ्या प्रवाळची माहिती घेऊ शकता। या ठिकाणी वेगवेगळ्या स्पंज , फुलपाखरे, वेगवेगळ्या गोम पाहायला मिळतील। येथील मत्यसंग्रहालय मध्ये वेगवेगळ्या माश्यांच्या जाती पाहायला मिळतील।
         यानंतर तुम्ही पोर्ट ब्लेअरला आजून दोन बाबी पहायच्या आहेत। चॅथम सॉ मिल व महात्मा गांधी नॅशनल मरीन पार्क।
            येथून 5 किमी अंतरावर चॅथम बेटावर ही लाकडाची वखार आहे। 1883 साली ही वखार चालू झाली होती।परंतु दुसऱ्या महायुद्धात ती नष्ट झाली होती। त्यानंतर ही 1950 साली पुन्हा चालू केली। ह्या मिलचे एवढे महत्त्व आहे की, ही एकमेव आहे। येथे मिळणारे लाकडाला पदौक लाकूड म्हणतात। हा येथील राजवृक्ष आहे। तो 120 फूट उंच वाढतो। येथे याची वने पाहून मन प्रफुल्लित होते। हे लाकूड आपल्याकडील सागवानी लाकडापेक्षा मजबूत असते।  ही वने सर्व प्रकारच्या लाकडी वस्तू साठी लाकडाचा पुरवठा करतात। जसे इमारती लाकूड, बांधकाम लाकूड, शोभेच्या वस्तू साठी लाकूड।
             आता महात्मा गांधी पार्क कडे जावे लागेल। हे एकुण 15 बेटांचे मिळून बनलेले आहे। हे पोर्ट ब्लेअर पासून 30 किमी लांब आहे। हे उद्यान प्लास्टिक मुक्त आहे। त्यामुळे येथे बाटली बंद पाणी नेण्यासही मनाई आहे। येथे आपल्याला दोन माणसासाठी एक वॉटर बॅग मिळते। पण त्यासाठी 200रुपये डिपॉझिट द्यावे लागेल। आपल्या बाटल्यांतील पाणी त्यांत ओतून घेऊन त्या बॅगाच बेटावर नेऊ दिल्या जातात। बाटलीबंद पाण्याच्या बाटल्या वंडूरलाच सोडून द्याव्या लागतात। इथे होणारी प्लॅस्टिकच्या पिशव्यांकरताची तपासणी एवढी इत्थंभूत असते की काही व्यक्ती मुद्दाम किंवा चुकून आणलेल्या बाटल्या येथेच सोडून जातात किंवा जावेच लागते। येथून आपल्याला छोट्या होड्यांतून जॉली बॉय बेटाकडे जावे लागते ।बेट खरेच खूप सुरेखच आहे। अगदी दृष्ट लागण्यासारखे। या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे ही बोट खालून काचेची असते। मग त्यातून समुद्र पाहून मन तृप्त होते। खरे स्वर्गात असल्याची अनुभूती प्राप्त होते। याकरिता तिकीट मात्र 400 रुपये पडेल।
      वरील सर्व पाहे पर्यंत तीन दिवस संपतील। येथे आपले पोर्ट ब्लेयर पाहून संपते।
         यानंतर नंबर लागतो तो हॅवलोक बेटाचा। संपूर्ण दिवस लागतो येथे। हे अंदाजे 60 किमी लांब आहे पोर्ट ब्लेअर पासून। फेरीने यावे लागते। येथून जाण्यासाठी सकाळी 6 , 8 व 12:30 वाजता फेरी आहे। भाडे 1500 रुपये प्रति व्यक्ती जाण्यासाठी व येण्यासाठी 1500 रुपये प्रति व्यक्ती असते। येण्यासाठी 3 वाजता दोन फेरी आहेत व 4 वाजता एक फेरी आहे। यानंतर आपलीआपली सोय पहावी लागते। यांचे दर एवढे आहेत, तर स्वतंत्र दर किती ...?
बर असो। आशियातील सर्वात सुंदर बीच आपल्याला येथे राधानगरी पाहायचा आहे। यानंतर आपण आपला मोर्च्या वळवायचा तो एलिफंटा बीच कडे। येथे तुम्ही हत्तींना त्रैनिंग देताना पाहू शकता। यानंतर येथे दोन बाबीपैकी एक बाब आवर्जून करावी। एक स्कुबा ड्राइविंग किंवा सी वॉक । दोन्ही साठी 3500 रुपये लागतील। एकूण 7000 रुपये जातील दोन्हीसाठी। यात मला तर सी वॉक जास्त आवडते। तुम्ही जेव्हा समुद्रात उतरता तेव्हा 5 जणांसाठी एक ट्रेनर असतो। त्यामुळे घाबरून जायचे नाही।
         पाचव्या दिवशी तुम्ही रॉस आईसलँडला भेट द्यावी। याचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस बेट केले आहे। येथे तुम्ही the lone sailer memorial पाहू शकता। तसेच Netaji Subhas Chandra Bose Island Graveyard हे सुद्धा पाहू शकता।
             यानंतर बारतंग बेट पाहू शकता। या बेटावर चुनखडीच्या गुंफा खूप पाहण्यासारख्या आहेत। येथे छोटे छोटे ज्वालामुखी देखील पाहु शकता। जवळच पॅरोट आईसलँड आहे। तेथे फक्त पोपटाचे साम्राज्य आहे। येथील पोपटांना शेपूट लांब असते। खूप नयनरम्य देखावा असतो तो।
            अश्या प्रकारे हे 5 ते 6 दिवस होतात। फेरीने जाणे साठी 70 तास व येणे साठी 70 तास मिळून 140 तास होतात। साधारण 6 दिवस होतात। एकूण 12 दिवसाची ही ट्रिप होईल।
जाण्यासाठी योग्य वेळ फेब्रुवारीचे शेवटचे दोन आठवडे व मार्चचे पहिले दोन आठवडे योग्य आहेत। इतर वेळी गेलात तर पाऊस व वातावरण मुळे जाऊनसुद्धा हॉटेलमध्ये बसून राहावे लागेल।
     
🐋🐋🐋🐳🐳🐳
 


Saturday, November 9, 2019

सातारा येथे काय काय पहाल ?

❄❄❄❄❄❄❄❄❄

*सातारा येथे काय काय पहाल ? *
====================

1. *कास तलाव व बामणोली*

साता-यापासून पश्चिमेला यवतेश्वर मार्गे २७ कि.मी. अंतरावर समुद्रसपाटीपासून १४३० मी. उंचीवर कास पठार लागतो. या तलावात अनेक नैसर्गिक झरे असल्यामुळे बारामाही पाणी असते. या तलावातून सातारा शहराला पाणी पुरवठा केला जातो. या पठारावर जांभूळ, करवंदे, फणस, आंबा, हिरडा व अनेक दुर्मिळ औषधी झाडे अस्तित्वात आहेत. कासपासून फक्त १२ कि.मी. अंतरावर बामणोली हे निसर्गप्रेमिचे आवडते ठिकाण आहे. नौकाविहार करण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण आहे.

2. *चाळकेवाडी व वनकुसवडे*

सातारा जिल्हा, ऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द पावला तो चाळकेवाडी व वनकुसवडे पठरावरील पवनऊर्जा प्रकल्पामुळे, ५० मीटर उंचीच्या मनो-यावरुन तीन पात्यांच्या विड टर्बाईनव्दारे वा-याच्या गतिज ऊर्जेचा वापर करुन विद्युत जनित्र फिरविले जाते. यातून पवन ऊर्जा निर्माण केली जाते. आशिया खंडातील सर्वात मोठा प्रक्ल्प येथे साकारला जात आहे. ८५७ पवन विद्युत जनित्रांच्या सहाय्याने ३१३ मेगावॅट वीज निर्माण केली जाते.

3. *ठोसेघर*

येथील धबधबे व सभोवतालचे निसर्ग समृध्द वातावरण यामुळे हे ठिकाण महत्वाचे पर्यटन केंद्र आहे. ठोसेघरचा मुख्य धबधबा ६०० फूट खोल दरीत पडताना पाहणे रोमांचकारक आहे. धबधबा पाहताना या ठिकाणी अनेक दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटना थांडविण्यासाठी या ठिकाणी अलीकडच्या काळात निरीक्षण गॅलरी आणि संरक्षण तारेच्या भितींची सोय करण्यात आली आहे.

4. *माहुली*

कृष्णा व वेण्णा नद्यांच्या संगमावरील पवित्र क्षेत्र. माहुली येथे कृष्णा नदी गावाच्या मधून वाहते. त्यामुळे श्रीक्षेत्र माहुली व संगम माहुली असे गावाचे दोन भाग पडतात. याठिकाणी श्रीमंत शाहू महाराजांची समाधी आहे. यवतेश्वर व मंगळागौरी, राधाशंकर, बिल्वेश्वर,रामेश्वर ही मंदिर प्रसिध्द आहेत. पेशवाईत नावाजलेले न्यायाधीश रामशास्त्री प्रमुणे यांचे हे जन्मगांव. येथे शाहू महाराजांचा लाडका कुत्रा खंडयाची समाधी आहे व राणी ताराबाईचे स्मारक आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सायराबाई सती गेली. त्याचे स्मरण म्हणून नदीशेजारील वाळवंटात दोन शिलिगे स्थापन करण्यात आलेली आहेत.

5. *यवतेश्वर*

निसर्गरम्य परिसरात हेमाडपंथी शिवालय आहे. या डोंगराची समुद्रसपाटी पासून उंची १२३० मीटर आहे. डोंगराच्या उत्तर बाजूच्या टेकडीवर भैरोबाचे मंदिर आहे. त्यास पेढयाचा भैरोबा म्हणतात.

6. *पाटेश्वर*

पाटेश्वर हे स्थळ साता-यापासून ७ मैलाच्या अंतरावर आग्नेय दिशेस एका टेकडीवर आहे. पाटेश्वर हे ठिकाण मुख्यतः महादेवाच्या मंदिरासाठी प्रसिध्द आहे. मठ, मंदिरे, गुहा व मूर्ती हे पर्यटकांचे आकर्षण आहे. हे मंदिर पेशवेकालीन सावकारपरशुराम नारायण अनघळ यांनी छत्रपती शाहूंच्या कारकिर्दीत बांधले.

7. *सज्जनगड*

समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण. या ठिकाणी समर्थांची समाधी आहे. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव परळी होते. हा किल्ला १६७६ मध्ये शिवाजी महाराजांनी जिकला होता. समर्थांच्या वास्तव्यामुळे परळीचे नाव सज्जनगड झाले. दास नवमीला येथे मोठा उत्सव असतो. गडावर सतत पाणी असणारी दोन तळी सुध्दा आहेत. अंगापूर डोहात सापडलेल्या मूर्तीचे आंगलाईचे मंदिर, पडकी मशिद, धर्मशाळा, समर्थांचा मठ, श्री. राम मंदिर व त्यांच्या तळघरात समर्थांची समाधी प्रेक्षणीय आहे. शेजघरात समर्थांनी वापरलेल्य वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये तांब्याचा मोठा हंडा, लोटा, कुबडी, गुप्ती आदी वस्तू त्याचप्रमाणे छ. शिवरायांनी समर्थांना भेट दिलेला पलंग पहावयास मिळतो. समर्थ रामदास महाराज ध्यानास बसत ती जागा रामघळ.

8. *धावडशी*

साता-याच्या वायव्येस असणारे धावडशी गाव ब्रम्हेंद्र स्वामींना १९२८ मध्ये छत्रपती शाहंकडूल इनाम म्हणून मिळाले होते. ब्रम्हेंद्र स्वामी छत्रपती शाहूंचे राजगुरु व पेशव्यांचे गुरु होते. सन १९४५ मध्ये ब्रम्हेंद्र स्वामी निवर्तल्यानंतर छत्रपती शाहूंनी त्यांच्या समाधीवर हे मंदिर बांधले. घ्मेरी झाशी नही दूँगीङ असे ठणकावून सांगणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई धावडशीच्या तांबे कुटुंबातल्याच. आज ही येथे त्यांच्या वाडयाचे अवशेष पहावयास मिळतात.

9.  *मर्ढे*

बा. सी. मर्ढेकर यांचे मूळ गांव. या गावात इ.स.वी सन १७०९ मध्ये छत्रपती शाहू महाराजांची छावणी होती. कृष्णा नदीच्या काठावरच सिघ्दामृत मठाची गढीवजा भव्य दगडी वास्तू उभी आहे. समर्थ रामदास स्वामींनी या मठाची स्थापना केली आहे. मठाचे तिसरे मठपती अमृतेश्वर यांनी पियुष रामायण कविताबध्द तसेच तत्वझाडा हा प्राकृत ग्रंथ लिहीला. पूर्वी या मठात सिध्दामृत विद्यापीठ होते.

10.  *शिवथर घळ*

समर्थांनी ज्या ठिकाणी दासबोध लिहला ते ठिकाण म्हणजे शिवथर घळ. भोर मार्गे महाडला जाताना वरंधा घाटाच्या अलिकडे शिवथर घळ लागते.

11.  *महादरे तलाव*

सातारा शहराच्या पश्चिमेला यवतेश्वर डोंगराच्या पायथ्याशी प्रतापसिह महाराजांनी हा तलाव बांधला.याची लांबी ८७ मीटर, रुंदी ८६ मीटर व खोली १० मीटर आहे. हा तलाव संपूर्ण घडीव दगडांनी बांधून घेण्यात आला आहे. या तलावाच्या दक्षिणेला हत्ती जलाव आहे.

12.  *कण्हेर धरण, कण्हेर*

सातारा तालुक्यात कण्हेर गावाजवळ वेण्ण नदीवर हे धरण १९७६ ते १९८८ मध्ये बांधण्यात आले. हे धरण मातीचे असून त्याची लांबी १३५५ मीटर आहे.

14. *सातारा*

अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी शाहू महाराजांनी बसविलेले ऐतिहासिक शहर १६९९ साली या शहरास छत्रपती शाहूंच्या राजधानीचा मान मिळाला.
अशी एकूण 14 पर्यटन स्थळे ही सातारा आजूबाजूला आहेत। आपल्या सोयीने यांचा क्रम लावून ही पहावीत।
आंतर जालातून साभार।


-------------------------------------
*सातारा शहर परिसरातील महत्वाची स्थळे*

=================

1. *अजिंक्यतारा*

सातारा शहराच्या दक्षिणेला असलेला मोठा किल्ला अजिंक्यतारा. अजिमतारा किवा मंगळाईचा डोंगर या नावाने ही ओळखला जातो. पूर्वी या किल्ल्यावरुन शहर व सभोवतालच्या विस्तीर्ण प्रदेशावर मावळे देखरेख करीत असत. या किल्ल्याच्या उतारावर शहराचा बराचसा भाग वसला आहे. शिलाहार वंशीय राजा दुसरा भोज याने ११९० मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला. १६९८ मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी सातारा ही मराठी राज्याची राजधानी जाहीर केली. आज या ठिकाणी मंगळादेवीचे मंदिर व पाण्याची सात तळी आहेत.

2. *चार भिती*

अजिंक्यता-यालगत असलेल्या टेकडीवर चार भिती येथे १८५७ च्या स्वातंत्र्य युध्दात आहुती देणा-या वीरांच्या स्मरणार्थ स्मारक स्तंभ उभारण्यात आला आहे. हा स्तंभ ३० फूट उंचीचा असून त्याभोवती चारी बाजुंना १० फूट उंचीच्या चार भिती व त्याभोवती छोटी तटबंदी आहे. या ठिकाणी झाशीची राणी लक्ष्मीबाई व प्रतापसिह महाराजांचे वकिल रंगो बापूजी गुप्ते यांचे अर्धपुतळे आहेत. स्तंभाच्या डाव्या बाजूवर १८५७ च्या धामधुमीतला हिदुस्तानचा नकाशा तर उजव्या बाजूला भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ठळक घटना सालासहित दिल्या आहेत.

3.  *जुना राजवाडा*

छत्रपती प्रतापसिह महाराज (पहिले) यांनी हा वाडा बांधला. सध्या या वाड्यात जिल्हा परिषदेचे प्रतापसिह हायस्कूल सुरु आहे.

4. *नवा राजवाडा*

आप्पासाहेब महाराज यांनी जुन्या राजवाड्याला लागूनच नवा राजवाडा बांधला आहे. या वाडयात पूर्वी कोर्टाचे कामकाज चालत असते. सध्या इतर शासकीय कार्यालये आहेत.

5. *छत्रपती शिवाजी संग्रहालय*

या ठिकाणी दुर्मिळ ऐतिहासिक पुरातन वस्तुंचा संग्रह आहे. हे वस्तु संग्रहालय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आहे. या संग्रहालयात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या व त्यांच्या घराण्यातील व्यक्तींनी वापरलेल्या वस्तु, साधने, शस्त्रे आणि पोशाखांचा संग्रह आहे. येथे भाले, कट्यारी, खंजीर, शिरस्त्राने, चिलखते,तलवारी, तोफगोळे, अंकुश, परशु, गुप्ती, धनुष्यबाण, किल्ल्याचा दरवाजा फोडण्यासाठी हत्तीकडून वापरावयाचेशस्त्र, सोनसळी,पडदे, गुप्तीचे प्रकार, रणशिग, जेडची मठ, बिचवा, पालखीच्या दांड्यावरील मानचिन्ह, वाघनखे, बंदुकांचे प्रकार, दारुच्या पुड्याचा शिगाडा, संगीनी, पिस्तुले इ. विविध प्रकारची युध्द साहित्य व साधने येथे मांडलेली आहेत. वस्त्र विभागामध्ये अंगरखा, जरिबुट्टीचे कपडे, साडया, पैठणी, फेटे, बख्तर,बाहू, आच्छादने, तुमान अनेक प्रकारच्या पगड्या, शेला, इ. समावेश होतो. या संग्रहालयामध्ये शिवाजी महाराजांची वंशावळ लावली आहे.

6.  *नटराज मंदिर*

दक्षिणात्य शैलीचे उत्तर चितंबरम हे चार गोपुरांचे मंदिर कृष्णानगर याठिकाणी आहे. शामराव शानभाग यांनी हे मंदिर स्वखर्चातून बांधले आहे. मूर्ती-प्रतिष्ठापना कांची पीठाचे अधिपती श्री. नरेंद्र सरस्वती यांचे हस्ते करण्यात आली. या मंदिरात नटराजाची पंचधातूची साडेचार फूटी उंचीची मूर्ती आहे. मंदिर समूहाच्या भेावताली चौकोनी आकाराची उंच तटभित आहे. या तटिभितीला चार मुख्य दिशांना प्रत्येकी पासष्ट फूट उंचीची चार गोपुरे आहेत. त्यांच्या बांधकामासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश सरकारने खर्च दिल्याने त्यांना त्यांची नावे देण्यात आली आहेत.

7. *श्री. कुरणेश्वर मंदिर*

पहिले बाजीराव पेशवे यांचे मेहुणे कृष्णाची चासकर यांनी १७२३ मध्ये हे दगडी मंदिर बांधले. शहराच्या पश्चिमेला परळीकडे जाताना बोगद्याच्या बाहेर १ मैलावर खिडीच्या गणपतीचे देवस्थान आहे. गणपतीची स्वयंभूमूर्ती असून कुरणेश्वर या नावाने ओळखली जाते.

8. *आयुर्वेदिक अर्कशाळा*

कै. डॉ. मो.ना. आगाशे यांनी स्थापन केलेली आयुर्वेदिक अर्कशाला लि. ही संस्था अनुभवसिध्द आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करते. या संस्थेची स्थापना १९२६ साली ८२ वर्षे अनुभव असलेली ही संस्था १२० ते १३० प्रकारची जुनी/नवी आयुर्वेदिक औषधे व शक्तीद्रव्ये तयार करीत आहेत.सर्वांना उपयुक्त अशी औषधे तयार करणारी अर्कशाळा साता-याचे भूषण आहे. हे ठिकाण म्हणजे पूर्वी तख्ताचा वाडा येथे होता. तेथे छत्रपतींचे सिहासन होते व दरबारही भरत असे.

9. *धननीची बाग शाहू बोर्डींग*

इसवी सन १९२४ साली सातारा शहरामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी छत्रपती शहू बोर्डींग हाऊस नावाचे छात्रालय सुरु करण्यात आले. कमवा व शिका या योजनेव्दारे स्वालंबनाचे आणि शिस्तीचे संस्कार या छात्रालयातील विद्यार्थ्यांवर केले जाऊ लागले.

10. *महानुभव मठ*

महानुभव पंताचे प्रणेते श्री. चक्रधर स्वामी आहेत. इ.स.१९१२ साली स्व. बाबा मोतीवाले यांनी या मळाची स्थापना केली. एकेश्वर वादाचा सिध्दांत हा महानुभावी पंथाचा मूलाधार आहे. या मठात नामस्मरण, चितन, मनन, पठण, चचग आदि भक्ती मार्ग अनुसरले जातात.

*शहरातील अन्य ठिकाणे*

प्रतापसिह उद्यान,शाहू उद्यान, भैरोबा मंदिर, गारेचा गणपती, पंचमुखी गणपती, ढोल्या गणपती, गोल मारुती मंदिर,फाशीचा वड, शाही मसजिद, अवर लेडी ऑफ हेल्थ चर्च, फुटके तळे, क्रांतीस्तंभ ही प्रेक्षणिय स्थळे आहेत.

🐋🐋🐋🐳🐳🐳

Sunday, November 3, 2019

बेंगलोर दर्शन मध्ये काय काय पहाल?

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

        *बेंगलोर दर्शन मध्ये काय काय पहाल?*

===============================
DAY 1

1.बेंगलोर येथे गेल्यागेल्या प्रथम सर विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल आणि टेक्नॉलॉजिकल संग्रहालय पाहणे हे संग्रहालय पाहण्यासाठी तीन तास लागतील
 10am to 2 pm





2. त्याच्या जवळच असलेले पुरातन विभागाची शासकीय संग्रहालय पाहावे

2pm to 4 pm



3. याच्या जवळच असलेले वेंकटप्पा आर्ट गॅलरी पाहावे
4pm to 5 pm.

4. त्याच्या पाठीमागे कब्बन पार्क आहे तिथे संध्याकाळी फिरवून घ्यावे अशा प्रकारे पहिला दिवस संपेल.

5pm to 7 pm

वरील ठिकाणी एकमेकाला अगदी चिटकून आहेत. मध्ये फक्त भिंतच आहे, त्यामुळे एकत्रित पणे ती सुचवलेली आहेत.

मुक्काम महाराष्ट्र  मंडळ येथे करावा.
मोबाईल नंबर 8022280609

माझ्याकडे असलेला नंबर मी येथे देत आहे .
जर चुकीचा असेल तर अपडेट सांगावे. एकदम तीन-चार दिवसांचे बुकिंग घ्यावे, म्हणजे पुन्हा गैरसोय होत नाही.

DAY 2


1.  दुसऱ्या दिवशी सर्वप्रथम तुम्ही बेंगलोर पॅलेस पाहण्यासाठी जावे. स्थापत्यशास्त्राचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. टिकीट साधारण 350 रुपये आहे. यात एक तुम्हाला हेडफोन मिळतो. ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणचा नंबर त्याठिकाणी दाबायचा .लगेच त्याची माहिती आपल्याला ऐकायला मिळेल .साधारण तीन तास पाहण्यासाठी लागतील.
 वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत
Time 10 am to 2 pm.



2. बेंगलोर पॅलेस पाहिल्यानंतर तुम्ही टिपू सुलतान समोर पॅलेस पाहण्यासाठी निघायचे आहे .संपूर्ण पॅलेस दोन मजली असून  लाकडाची निर्मिती आहे .पाहण्यासाठी एक ते दीड तास लागेल . या पॅलेसला चिटकून बालाजीचे सुंदर मंदिर आहे, ते पण पाहून घ्यावे.

हा पॅलेस पाहीपर्यंत साडेपाच वाजतील

Time 3 pm to 5 pm

3. यानंतर आपण इस्कॉन टेम्पल पाहण्यासाठी जायचे आहे। इथे गर्दी खूप असते त्यामुळे लवकर पोचलेले बरे!
         संपूर्ण दिवसभराचा शिणवटा निघून जाईल. डोळ्याचे पारणे फिटेल .असे हे छान इस्कॉन टेम्पल आहे. पाहण्यासाठी वेळ तीन तास लागतो. दुसरा दिवस आपला येथे संपेल

Time 6 pm to 9 pm

DAY 3

1. तिसर्‍या दिवशी सकाळी आपण एच ए एल चे विमान संग्रहालय पाहण्यासाठी जायचे आहे .आपल्या वायुदलातील विविध प्रकारची वापरलेली जुनी विमाने, हेलिकॉप्टर, त्यांची इंजिन्स हे सर्व आपल्याला येथे पाहण्यासाठी मिळतील पाहण्यासाठी साधारण तीन तास वेळ लागेल.
Time 10 am to 2 pm

2. त्यानंतर आपण दोड्डा गणेश मंदिर व बुल टेम्पल पाण्यासाठी निघायचे आहे.
वरील दोन्ही मंदिर अगदी जवळ जवळ आहेत .पार्किंग बुल टेम्पल जवळ करायचे आहे. दोन्ही मंदिरे पाण्यासाठी साधारण दीड तास ते दोन तास वेळ लागेल.
Time 3 pm to 5pm.

3. संध्याकाळी शिवम शिवा टेम्पल पाहण्यासाठी जायचे आहे. भारतातील दोन नंबर उंचीची भगवान शिवाची मूर्ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल .या ठिकाणी जाण्याचा मार्ग सुद्धा अतिशय कल्पकतेने तयार केलेला आहे .मात्र तिकिट rs.350 आहे . जाताना तुम्हाला बारा ज्योतिर्लिंग अभिषेक करत करत जावे लागेल . त्यानंतर सर्वात मोठी गणेश जी ची मूर्ती दिसते . मग तुम्हाला समोर भगवान महादेवाची मूर्ती दिसेल .
         यासाठी याच मंदिराला  चिटकून असलेल्या मॉल च्या पार्किंग मध्ये गाडी पार्क करावी लागेल. त्यासाठी मात्र 70 ते 80 रुपये लागतील.

DAY 4

1. या दिवसाची तयारी तुम्हाला तिसऱ्या दिवशीच करावी लागेल त्यासाठी तुम्ही ऑनलाईन बुक माय शो वरून तारांगणा ची तिकीटे बुक करावी लागतील.
 सकाळ सकाळी जाऊन तिकीट बुक करून हा शो बघणे होत नाही.
Show Schedule :
Our Solar System
English at 12.30 pm
 Kannada at 2:30 pm

Celestial Fireworks
Kannada : 3:30 pm, 
 English : 4:30 pm

Additional show only on Sundays:
Dawn of Space Age
English at 10.30 am 

Kannada at 11:30 am


वरील नियोजन लक्षात घेऊन बुकिंग यावे
Time 12:30 pm  to 2:30 pm

2.  त्यानंतर बॅसिलिका चर्च पाहण्यास जावे साधारण एक तास वेळ लागेल.
Time 3 pm to 4 pm .


3. त्यानंतर एक्वेरियम संग्रहालय पाहण्यास 
जावे. सरासरी हे संग्रहालय पाहण्यास दोन तास लागतील. विविध प्रकारचे मासे या ठिकाणी पाहायला उपलब्ध आहेत.  एकूण हे मत्स्यालय दोन मजली उंच आहे . डोळ्याचे वेगवेगळे मासे पाहून पारणे फिटते।

Time 4pm to 5:30 pm 

4.  संध्याकाळी इंदिरा गांधी म्युझिकल कारंजे पाहण्यास जावे.
Time 7 pm to 9 pm


DAY 5

1. पाचव्या दिवशी तुम्ही बाणेरगट्टा पार्क पाहू शकता। हे एकच पार्क नसून आतल्या आत अनेक छोटे छोटे पार्क आहेत। जसे मगर पार्क, सर्प उद्यान, प्राणिसंग्रहालय, children पार्क या सर्व बाबी येतात। हा पार्क पाहण्यासाठी त्यांची कार किंवा बस करावी लागते। तिकीट दर 80 रुपये प्रौढ व 40 रुपये लहानास। यासाठी 4 तास वेळ लागेल।

TIME 10 AM TO 3 PM

2. यानंतर तुम्ही लुम्बिनी गार्डन पाहू शकता।

Time 4 to 7 pm


🐋🐋🐋🐳🐳🐳

Saturday, August 31, 2019

महादेव मंदिर, महानंदी, कुरनूल, आंध्रप्रदेश।

           आज बऱ्याच दिवसानंतर मी पोस्ट लिहित आहे. आज निवांत वेळ मिळाला म्हणून हा लेखन प्रपंच . आजचे हे पर्यटन स्थळ पाहून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. त्याची आठवण अजूनही ताजी आहे. साधारण दुपारी एक वाजता मी श्रीशैल्य येथे महादेवाचे दर्शन घेतले. त्यानंतर मी नंद्याळ कडे निघालो. जाईपर्यंत माझी हीच समजूत होती की ,नंद्याळ व महानंदी हे एकच ठिकाण आहे .पण तिथे गेल्यावर कळले की ,हे दोन्ही वेगवेगळे आहेत .

           जेवण करेपर्यंत श्रीशैल्यम मध्ये तीन वाजले होते. त्यानंतर श्रीशैल्यम चा घाट अजून उतरायचा होता. मनात एक किंचितशी धाकधूक होती. नवीन रस्ता तसेच घाट पण अवघड होता. असे मोठे घाट उतरण्याची किंवा चढण्याची माझी मनाची तसेच गाडीची दोन्हीची ची तयारी नव्हती. पण आता हळूहळू उतरावे लागणार होते . थोडा उसासा घेतला. मनाला म्हटले ,"ऑल इज वेल".
        लगेच गाडीचा स्टार्टर मारला. तिथून निघालो ते थेट नंद्याळ मधेच गाडी उभी केली. तिथे एका टपरीवर चहा घेतला. मग मात्र मला बरे वाटले कारण ,वाटेत निसर्ग हा दहा दहा मिनिटाला नवा अवतार दाखवत होता. चहा झाल्यावर मग मी विचारपूस सुरु केली  . इथे मोठा नंदी कुठे आहे ? मग उत्तर मिळाले की, येथे एकूण नऊ नंदी आहेत. तुम्ही कोठे जाणार ? झाली का पंचाईत! यासाठी आपण कुठे जाणार याची संपूर्ण माहिती हवी. पण सोबत भाऊ होता. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला सर्व माहिती होती. पण तिथे गेल्यावर वेगळीच परिस्थिती!
       मग चहावाल्याला विचारले की, महानंदी किंवा येथे मोठा साधारण 20 ते 25 फूट उंचीचा नंदी आहे का?  मग तो हसला आणि म्हणाला इथून वीस किमी अंतरावर महानंदी नावाचे छोटेसे गाव आहे तिथे जावा. आणि हो लवकर जावा कारण,आता 7 वाजले आहेत. रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य असूं शकतो. तसेच गेल्यावर पटकन मुक्कामाची व्यवस्था पाहून घ्या,नाहीतर तिथे मुक्काम होणे अवघडच आहे.मग थोडीशी भीत भीतच आम्ही निघालो.त्या चहावाल्याने सांगीतले तशी आमची एकच गाडी त्या रोडने जात होती आणि संपूर्णपणे सभोवती काळोख पडला होता.रस्ता अनोळखी होता. शिवाय खूप भूक लागलेली होती.वीस किलोमीटर जायला कधी नव्हे तो मला एक तास लागला.त्याच वेळी एका वळणावर माझा रस्ता चुकला.कळले सुद्धा पाच किलोमीटर पुढे गेल्यावर ! पाच किलोमीटर पुढे गेल्यानंतर एका टपरीवजा छोटेसे हॉटेल होत.तिथे चौकशी केली.त्यांनी पुढे आल्याचे सांगितले. मग मात्र माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला.अजून पाच कीमी मागे जायचे ! आधीच खूप अंधार होता. रस्त्याने माझी एकच गाडी आणि अजून मागे जायचे म्हणजे खूपच त्रास दायक होते.पण गेल्या शिवाय गत्यंतर नव्हते. त्याच हॉटेल वाल्याला येथे मुक्कामाची सोय आहे का ?असे विचारले असता , त्यांनी महानंदी ला किंवा नंद्याल ला जाण्यास सांगितले.मग मात्र माझी भटकंती करण्याची हाऊस फिटते की काय ! अशी स्थिती झाली होती.
               त्यानंतर मी गाडी दिली भावाकडे आणि झालो वाटाड्या ! त्यांनी हळूहळू गाडी वळणा पर्यंत आणली . तिथून मग आत गेलो फक्त एकच की मी !  हेही विशेष होते . तोपर्यंत रात्रीचे दहा वाजले होते.
         आत जाताच प्रथम दर्शन झाले ते मुक्काम वाले एजंट चे ! एक दोन नव्हे चक्क पाच-सहाजण टोळके करून उभी होती . त्यांच्या तावडीतून सुटणे शक्य नव्हते . मग थोडस विचारपूस केली. प्रत्येकाचा रेट वेगळा होता. मी मात्र समोर दिसणाऱ्या हॉटेलचा आधार घ्यायचे ठरवले . मी यांना नाही म्हणून सांगितले . नेहमीच्या पद्धतीत रूम मिळणार नाही, कुठेतरी फसाल, ज्यादा पैसे जातील असे वाक्य ऐकले .  मी मात्र दुर्लक्ष करणेच पसंत केले.  लगेच समोर असलेले हॉटेल जवळ केले .
                  हॉटेल म्हणजे हॉटेल नसून एक मोठी टपरी होती.  पण म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार ! गेल्यागेल्या पहिले तर तिथे तो गरम भजी काढत होता . आधीची भजी घेतली . मग जवळची डब्यातली काढले . तसे त्याने गरम वडे हवेत का विचारले.  मला वाटले दोन-तीन तास आधीचे असतील . म्हणून माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे होते . पण ते पाहून तो म्हणाला साहेब फक्त भाजी तयार आहे तुम्हाला हवे असतील तर गरम तयार करून देतो .एकूण दहा ते बारा होतील मग मीही आनंदानं तयार झालो. त्यानंतर थोडी विचारपूस केली तर तो म्हणाला आमच्याकडे भजी वडे यासारख्या पदार्थांना मागणी नसते . वरून कोण आले तरच लागतात . नाहीतर इडली द्वाशी उताप्पा या वरच भागते. वरून म्हणजे महाराष्ट्र गुजरात मधून असे त्याला म्हणायचे होते हे मला नंतर कळले.
           मग मी सरळ विषयाला हात घातला कोठे मुक्कामाची सोय होईल का? विचारले . तसा तो म्हणाला आंध्रप्रदेश चे पर्यटक संकुल आहे . तसेच टी टी डी चे भक्तनिवास आहे .तसेच इतर खाजगी सोयी पण आहेत . अगोदर ते दोन आधी मिळतात का ते पहा ,असे सुचवले . मग आम्ही आधी आंध्रप्रदेशचे पर्यटक संकुल कडे निघालो. चालत दहा मिनिटाचा तिथे पोचलो. तर ते फुल निघाले .मग गाडी निघाली भक्तनिवास संकुल कडे . जाताना मन धाकधूक करत होते . हे जर फुल्ल असेल तर आधी भेटलेल्या खाजगी उंटाचे पाय धरावे लागतात की काय ? पण नशीब बलवत्तर होते .तिथे पाच रूम शिल्लक होत्या . पाचही पाहून एक पसंद केली . गाडी पार्किंगला लावली .सर्वजण दिवसभराच्या त्रासामुळे पटकन झोपी गेले .
          सकाळी उठल्याबरोबर आधी हे भक्तनिवास न्याहाळाय चे काम केले . चांगली दोन मजली इमारत होती! एकूण खालच्या मजल्यावर 15 खोल्या वरच्या मजल्यावर 15 खोल्या असे तीस रूमचे संकुल होते ते. या ठिकाणी एक कमतरता जाणवली ती म्हणजे बाथरूम टॉयलेट सर्वांना कॉमन होते. मग सर्वांना उठवले. तासाभरात सर्व जण तयार झाले .आम्ही लगेच महानंदी मंदिर पाहण्यास निघालो. जवळच दहा मिनिटांच्या अंतरावर मंदिर ! आत जाताना खूप मोठ्या कमानीतून प्रवेश करावा लागला .कमानी वरील नक्षीकाम अतिशय कोरीव होते. आत पादत्राणे स्टँडला लावली .सरळ आत गेलो .आतमध्ये तीन कुंड होते . या कुंडाचे पाणी काचेसारखे पांढरेशुभ्र होते .असे शुद्ध पाणी पाहून मन प्रसन्न झाले.
       मुख्य मंदिराभोवती तीन कुंड होते. पहिला ब्रह्मकुंड , दुसऱ्या विष्णू कुंड आणि तिसरे रुद्र कुंड .पण तिसरे कुंड मंदिरात होते .या कुंडात येणारे पाणी आतील महादेवाच्या पिंडी खालून येणारे होते.
           या कुंडाची रचना अद्भुत होती . या तीनही कुंडात तर पाच फुटांपर्यंत पाणी राहू शकत होते .जर पाणी पातळी जास्त होत असेल , तर बाजूला असलेल्या दगडी पाइपातून बाहेर जात होते .त्यामुळे ते पाणी वाहत जाऊन पाणी पातळी पाच फुटांपर्यंत होत होती.
         हे मंदिर साधारण सातव्या शतकात बांधलेले होते. त्या बांधलेल्या दिवसापासून हे पाणी आज पर्यंत वाहत होते. यात कधीही खंड पडला नव्हता हे विशेष!
     मंदिरात दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. साधारण एका तासात दर्शन झाले. बाहेर येताच एक गोष्ट जाणवली की मन खूप शांत झाली आहे . चिंता संपल्यासारखे वाटले. तसेच प्रवासाची काळजीही केव्हाच निघून गेली ती कळली नाही ! बाहेर येताच वेगवेगळ्या आकाराच्या गणपतीच्या एकूण नऊ मुर्त्या दिसल्या . नुकत्याच नवीन रंगात रंगवले असे वाटले . तिथे छान फोटो काढले आणि मग रात्रीच्या हॉटेल वाल्या कडे नष्ट केला . आम्ही तिरुपती चाललो असे त्याला सांगितले. त्याला एक गोष्ट विचारली की आम्ही येथे खूप मोठा नंदी पाहण्यासाठी आलो होतो ,पण इथे तर महादेवाचे मंदिर पाहायला मिळाले .त्यावर तो म्हणाला येथून पाचशे मीटर अंतरावर नंदी पार्क आहे.तिथे तो नंदी आहे.
        मग आम्ही नंदी पार्क कडे निघालो. येथील नंदी पाहून खरोखरच आश्चर्यचकित झालो! साधारण तीस फूट उंचीचा होता ! चांगल्या बसलेल्या अवस्थेतील होता. पुढील दोन पाय अगदी रुबाबात दुमडलेले होते. मान सरळ व डोळे आपल्याकडे पाहात आहेत असे होते.  त्याचे रंग काम अतिशय उत्कृष्ट होते . नंदी पार्कचे मधोमध हा नंदी होता. या पार्कला संपूर्णपणे कंपाऊंड होते . अतिशय रुबाबदार ,आकर्षक ,मनमोहक ,सुंदर, सगळ्यात उंच नंदी पाहून मन उल्हसित झाले . येथे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे .परंतु आतील परवानाधारक कॅमेऱ्याला मात्र परवानगी आहे. मी मात्र बाहेरून फोटो काढणे पसंत केले. त्यानंतर मी तिरुपती कडे निघालो.





Sunday, February 24, 2019

गरम पाण्याचे कुंड, उन्हेरे।

             गरम पाण्याचे कुंड, उन्हेरे।

पृथ्वीवर असणाऱ्या अनेक चमत्कारां पैकी एक चमत्कार म्हणजे गरम पाण्याची कुंडे किंवा झरे। यांनाच उन्हेरे म्हणतात। आणखी इतरही नावे आहेत। पृथ्वी च्या पोटात घडणाऱ्या प्रक्रियांमुळे हे पाणी गरम होते। जमिनीत च्या वर येते। यालाच इंग्रजी मध्ये हॉट स्प्रिंग असे म्हणतात। अशी उन्हेरे नेहमी ज्वालामुखीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात आढळतात। कारण पावसाचे पाणी जमिनीत मुरले की ते गरम होते। तसेच काही पाण्याची वाफ पण होते। मग हे पाणी खडकामध्ये असलेल्या फटीतून बाहेर येते। या पाण्यात अनेक खनिजे तोपर्यंत मिसळली जातात। बहुदा जास्त प्रमाणात गन्धक असते। असे हे पाणी औषधी पाणी होते। या पाण्यात आंघोळ केल्यास त्वचा रोग बरे होतात, ते याच कारणामुळे।
            आपल्या देशात एकूण 340 ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत। महाराष्ट्रात 28 ठिकाणी हे झरे असल्याची नोंद मी अंतर जालातून घेतली आहे। त्यापैकी 1. अकलोली 2. उनकेश्वर 3. उनपदेव 4.उन्हेरे 5.गणेशपुरी 6.खेड 7.तुरळ 8.देवनवरी 9. राजवाडा 10. राजापूर 11.वज्रेश्वरी 12.सव 13. सातीवली 14.सूनपदेव 15.पाली ही मी मिळवली आहेत।
          दीपावलीच्या सुट्टीत अष्टविनायक दर्शन झाले। शेवटचा गणपती पालीचा होता। मुक्काम पाली येथे भक्त निवास मध्ये केला होता। झोपतानाच सकाळची आंघोळ उन्हेरेला करायची असे ठरवले होते।
          सकाळी 7:30ला पालीचे भक्त निवास सोडले। जायच्या आगोदर दात घासुन घेतले होते, पण आंघोळ केली नव्हती । आंघोळ सरळ कुंडातच करण्याचा विचार होता। झालेही तसेच । 15 मिनिटात कुंडाजवळ उभा होतो। गाडी पार्किंगला लावली। आवश्यक वस्तू टॉवेल, बनियन वगैरे घेऊन कुंडाजवळ गेलो।सरळ कुंडातच उतरलो। पाणी चांगलेच गरम होते।पण हिवाळा असल्याने जाणीव झाली नाही।जवळजवळ एक तास कुंडातच बसून होतो। खूप खूप आनंदी, समाधानी व फ्रेश वाटले।
          या ठिकाणी एकूण तीन कुंड आहेत। दोन बंदीस्त केलेली आहेत। त्या दोन पैकी एक महिलांच्या साठी तर दुसरे पुरुषांच्या साठी आहे। या दोन कुंडातील पाणी आंघोळ साठी आवश्यक तेवढे गरम आहे। पण तिसऱ्या कुंडातील पाणी जास्त गरम आहे। बंदिस्त दोन कुंडात लाकडी फळ्या टाकल्या आहेत। त्यामुळे त्यात उभा राहून अंघोळ करता येते। तर तिसऱ्या कुंडात लोखंडी जाळी टाकली आहे। मी मात्र तिसऱ्या कुंडातच उतरलो। पाणी जास्त गरम असले तरी। माझ्याबरोबर माझा मुलगा अथर्व हाही त्याच कुंडात होता, हे विशेष।
        याठिकाणी अंघोळ करताना साबण, शाम्पू लावणे टाळावे।तसेच चुळा या पाण्याने भरू नयेत। या पाण्यात पोहू नये।  तसेच हे पाणी पिऊ नये। या ठिकाणी पाळीव प्राणी नेऊ नयेत। ही काळजी आपण स्वतः हुन घेतलेली बरी असे मला वाटते।





Sunday, February 10, 2019

तुळशी वृंदावन बाग, पंढरपूर।

खूप दिवसांनी पोस्ट लिहीत आहे। साडीच्या व्यवसाय मुळे कदाचित जमत नसेल । असो आजपासून आरंभ......
       आज मुलाची परीक्षा सिद्धेवाडी ता पंढरपूर येथे होती। कधी नाही ते वेळेचे गणित आज चुकले। 11:00 वाजता परीक्षा होती। पण रस्ता खराब व वेळेचे नियोजन चुकीचे झाल्याने मी पोचलो 11:30 ला ....!  तो पर्यंत सौची बडबड चालूच...! मग मुलाने कसाबसा पेपर दिला। मी मात्र हायसे झालो। हुश्श... तो पण आणि मी पण .....👍
        मग निघालो पंढरपूर कडे। भटकंती चे मन काही स्वस्थ बसेना। काय पहावे। हाच विचार मनात येत होता। बरेचदा येथे येऊन गेलो त्यामुळे सर्व काही पाहून झाले होते। पण आता मला खुणावत होती ती तुळशी वृंदावन बाग...!!!
      नुकतेच 25 जानेवारीला या बागेचे उद्घाटन थाटात संपन्न झाले होते। मग गाडीचे स्टेरिंग सरळ बागेपाशी जाऊन थांबले।
           मुख्य रस्त्यापर्यंत पेविंग ब्लॉक्स होते। हे पाहून आत नक्की कोरीव काम असणार हे मी जाणले। आत जाताना कंपौडच्या दोन्ही बाजू अतिशय सुंदर रंगवलेल्या दिसल्या। त्यावर वेगवेगळे पक्षी , प्राणी होते। मुले ते पाहून खूप खुश झाली। आत गेल्यावर मात्र मन निराश झाले। बागेची वेळ सकाळी 6 ते 9 व संध्याकाळी 6 ते 9:30 आहे असे समजले। तरीपण मी बाहेरून संपूर्ण बाग पाहून घेतली। या बागेला दोन गेट आहेत। पहिले गेट मधून आत गेल्यावर दुसरे बागेसाठी आहे। तिथे सुंदर कोरीव काम केले आहे। असे वाटते जणू काही प्रत्यक्ष स्वर्गात च आहे। त्या गेटच्या दोन्ही बाजूला दोन रूम आहेत। एक तिकीट विक्री साठी व दुसरी गार्ड साठी। आत पाहताच दर्शन होते, ज्ञानेश्वर माऊली चे..! खूपच आकर्षक घडण आहे । मग इतर पण मुर्त्या आहेत, पण बाग बंद असलेने पाहता आल्या नाहीत। एक मूर्ती पण विशेष लक्ष वेधून घेत होती। ती होती... पांडुरंगाची!!! ही मूर्ती 24 फूट उंचीची आहे। जशी मुख्य मंदिरात आहे तशी...! किंबहुना अधिक सरस। विठ्ठल मूर्ती च्या तिन्ही बाजूंनी पालखी सोहळ्याचे चित्र कोरण्यात आहे। समोरील बाजूस एक महिला वारकरी तुळशीपात्र डोक्यावर घेऊन उभी आहे असे दाखवण्यात आले आहे। इतर वारकरी बाजूस उभे आहेत। हे सर्व फायबरचे आहे।तसेच या वृंदावनात संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ ...आदी संतांच्या संगमरवरी मुर्त्या आहेत। जगात एकूण 24 प्रकारच्या तुळस आहेत। त्यापैकी 8 प्रकारच्या तुळस येथे आहेत। तसेच विविध प्रकारच्या फुलांची झाडे पण आहेत। उल्लेखनीय बाब म्हणजे येथे मधोमध कारंजे पण आहेत। सोलापूर वनविभागाने नमामि चंद्रभागा कार्यक्रमांतर्गत पंढरपूर येथील यमाई तलावाच्या परिसरातील २ हेक्टर जागेत तुळशी वृंदावन वनउद्योन तयार केले आहे।
          पंढरपूर ला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सन 1874 मध्ये येथील ओढ्याला बंधारा घातला। आणि हाच तो यमाई तलाव...!!!! या बंधाऱ्यामुळे 196 एकर पाणीसाठा उपलब्ध झाला। मग येथले पाणी लोखंडी पाईप मधीन सायफन पद्धतीने नेले जात होते। पुढील काळात भीमा नदीवरून पाणीपुरवठा सुरू झाला व ही योजना बंद झाली। हा दुर्लक्ष झालेला तलाव आता नावारूपाला आला....!!!