खूप दिवसांनी पोस्ट लिहीत आहे। साडीच्या व्यवसाय मुळे कदाचित जमत नसेल । असो आजपासून आरंभ......
आज मुलाची परीक्षा सिद्धेवाडी ता पंढरपूर येथे होती। कधी नाही ते वेळेचे गणित आज चुकले। 11:00 वाजता परीक्षा होती। पण रस्ता खराब व वेळेचे नियोजन चुकीचे झाल्याने मी पोचलो 11:30 ला ....! तो पर्यंत सौची बडबड चालूच...! मग मुलाने कसाबसा पेपर दिला। मी मात्र हायसे झालो। हुश्श... तो पण आणि मी पण .....👍
मग निघालो पंढरपूर कडे। भटकंती चे मन काही स्वस्थ बसेना। काय पहावे। हाच विचार मनात येत होता। बरेचदा येथे येऊन गेलो त्यामुळे सर्व काही पाहून झाले होते। पण आता मला खुणावत होती ती तुळशी वृंदावन बाग...!!!
नुकतेच 25 जानेवारीला या बागेचे उद्घाटन थाटात संपन्न झाले होते। मग गाडीचे स्टेरिंग सरळ बागेपाशी जाऊन थांबले।
मुख्य रस्त्यापर्यंत पेविंग ब्लॉक्स होते। हे पाहून आत नक्की कोरीव काम असणार हे मी जाणले। आत जाताना कंपौडच्या दोन्ही बाजू अतिशय सुंदर रंगवलेल्या दिसल्या। त्यावर वेगवेगळे पक्षी , प्राणी होते। मुले ते पाहून खूप खुश झाली। आत गेल्यावर मात्र मन निराश झाले। बागेची वेळ सकाळी 6 ते 9 व संध्याकाळी 6 ते 9:30 आहे असे समजले। तरीपण मी बाहेरून संपूर्ण बाग पाहून घेतली। या बागेला दोन गेट आहेत। पहिले गेट मधून आत गेल्यावर दुसरे बागेसाठी आहे। तिथे सुंदर कोरीव काम केले आहे। असे वाटते जणू काही प्रत्यक्ष स्वर्गात च आहे। त्या गेटच्या दोन्ही बाजूला दोन रूम आहेत। एक तिकीट विक्री साठी व दुसरी गार्ड साठी। आत पाहताच दर्शन होते, ज्ञानेश्वर माऊली चे..! खूपच आकर्षक घडण आहे । मग इतर पण मुर्त्या आहेत, पण बाग बंद असलेने पाहता आल्या नाहीत। एक मूर्ती पण विशेष लक्ष वेधून घेत होती। ती होती... पांडुरंगाची!!! ही मूर्ती 24 फूट उंचीची आहे। जशी मुख्य मंदिरात आहे तशी...! किंबहुना अधिक सरस। विठ्ठल मूर्ती च्या तिन्ही बाजूंनी पालखी सोहळ्याचे चित्र कोरण्यात आहे। समोरील बाजूस एक महिला वारकरी तुळशीपात्र डोक्यावर घेऊन उभी आहे असे दाखवण्यात आले आहे। इतर वारकरी बाजूस उभे आहेत। हे सर्व फायबरचे आहे।तसेच या वृंदावनात संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ ...आदी संतांच्या संगमरवरी मुर्त्या आहेत। जगात एकूण 24 प्रकारच्या तुळस आहेत। त्यापैकी 8 प्रकारच्या तुळस येथे आहेत। तसेच विविध प्रकारच्या फुलांची झाडे पण आहेत। उल्लेखनीय बाब म्हणजे येथे मधोमध कारंजे पण आहेत। सोलापूर वनविभागाने नमामि चंद्रभागा कार्यक्रमांतर्गत पंढरपूर येथील यमाई तलावाच्या परिसरातील २ हेक्टर जागेत तुळशी वृंदावन वनउद्योन तयार केले आहे।
पंढरपूर ला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सन 1874 मध्ये येथील ओढ्याला बंधारा घातला। आणि हाच तो यमाई तलाव...!!!! या बंधाऱ्यामुळे 196 एकर पाणीसाठा उपलब्ध झाला। मग येथले पाणी लोखंडी पाईप मधीन सायफन पद्धतीने नेले जात होते। पुढील काळात भीमा नदीवरून पाणीपुरवठा सुरू झाला व ही योजना बंद झाली। हा दुर्लक्ष झालेला तलाव आता नावारूपाला आला....!!!

No comments:
Post a Comment