Wednesday, November 14, 2018

भिलार ........ एक पुस्तकांचे गाव.

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

          भिलार ........ एक पुस्तकांचे गाव.

================================

          मी माझ्या भटकंती मध्ये आवर्जून भेट दिलेले गाव। तसे या गावाबद्दल मी वर्तमानपत्र मधून वाचले होते। पण प्रत्यक्षात काल पाहायला मिळाले। महाबळेश्वर सोडून वाईकडे येताना 12 किमीवर आहे। गावात येताच एका किराणा दुकानात थोडी चौकशी केली असता , त्यांनी मला प्रकल्प कार्यालयात जाणेविषयी सुचविले। मी लगेच कार्यालयात गेलो। तेथे प्रमुख व्यक्ती, श्री राजेश जाधव हे अतिशय मन मिळावू होते। त्यांनी संपूर्ण प्रकल्प माहिती तर दिलीच शिवाय यासंबंधी असलेला व्हिडिओ पण दाखवला। तसेच गावात कुठे कुठे पुस्तके आहेत त्याचे माहिती पत्रक पण दिले। खूप समाधान वाटले।







                  या पुस्तकाच्या गावामध्ये 30 घरांमध्ये वेगवेगळया साहित्य प्रकाराची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. वाचन चळवळ वाढावी, येणाऱ्या पर्यटकांना मराठी भाषेची समृद्धी कळावी म्हणून मराठी भाषेतील नवे-जुने लेखन, संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित, चरित्रे-आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य आणि इतिहास याचे प्रत्येक घरात वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची दालन उभी केली आहेत. निवडलेल्या 30 घरांवर विविध प्रकारची चित्र रेखाटण्यात आली आहेत. चित्राच्या संगतीनुसार त्या घरात वाचकाला साहित्य उपलब्ध होते. ज्या घरांच्या भिंतीवर निसर्ग चित्र काढण्यात आली आहेत, त्या घरात निसर्ग चित्रण अथवा प्रवास वर्णनपर साहित्य ठेवण्यात आले आहे. ऐतिहासिक चित्र रेखाटलेल्या घरात ऐतिहासिक साहित्य वाचनासाठी ठेवण्यात आले आहे. संतांची चित्र काढलेल्या घरामध्ये संतवाड;मय व अध्यात्मिक पुस्तकांची भेट वाचकांना होते. अशा प्रकारे केवळ चित्रांवरुन पर्यटकाला त्या घरात कोणते साहित्य वाचनाला उपलब्ध आहे, याची माहिती मिळते. 
         पुस्तकांचे गाव प्रकल्पासाठी निवडलेल्या घरांची व ठिकाणांची नावे : 

1.हिलरेंज हायस्कूल-बालसाहित्य, 
2. अनिल भिलारे- स्पर्धा परीक्षा
3.बाळासाहेब भिलारे- कादंबरी, 
4.अनमोल्स ईन-राहूल भिलारे- महाराष्ट्र प्रदेश, मराठी भाषा व संस्कृती, 
5.शिवसागर- सुभाष भिलारे- विज्ञान, 
6.श्री हनुमान मंदिर-नियतकालिके व साहित्यिक माहिती फलक (प्रदर्शन), 
7. साई-मंदा भिलारे क्रीडा व विविध लोकप्रिय,
8. गणपत भिलारे- दिवाळी अंक, 
9.कृषी कांचन, शशिकांत भिलारे-चरित्रे व आत्मचरित्रे, बोलकी पुस्तके, 
10.साई रेस्टॉरंट-विजय भिलारे- इतिहास, 
11.विशाल भिलारे- वर्तमानपत्रे, साप्ताहिके,
12. मंगलतारा- प्रशांत भिलारे- छत्रपती शिवाजी महाराज, शिवकालीन इतिहास व गडकिल्ले, 
13. प्रकाश भिलारे-चरित्रे व आत्मचरित्रे
14. दत्तात्रय भिलारे- परिवर्तन चळवळ, समाजसुधारकांचा व सुधारणांचा इतिहास,
15. अनिल भिलारे-स्त्री साहित्य,
16. गिरीजा रिसॉर्ट- कविता.
17.श्री जननीमाता मंदिर, संत साहित्य,
18. श्री जननीमाता मंदिर (श्री गणपती मंदिरा जवळ)- साहित्यिक माहितीफलक (प्रदर्शन) 
19.मयूर रिसॉर्ट, अजय मोरे-निसर्ग, पर्यटन आणि पर्यावरण, 
20.प्रवीण भिलारे-कथा, 
21.नारायण वाडकर- लोकसाहित्य, 
22.तानाजी भिलारे-कादंबरी, 
23.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-बालसाहित्य, 
24.सुहास काळे-ललित गद्य व वैचारिक, 
25.श्रीराम मंदिर साहित्यिक (प्रदर्शन) आणि भाषीक व साहित्यिक खेळ, 
26.श्याम भिलारे-नातकव चित्रपट
27.संतोष सावंत- विनोदी, जिव्हाळा, 
28.संपत भिलारे-चित्रमय पुस्तके
29.आकाश भिलारे-विविध लोकप्रिय व पुरस्कार विजेते, 
30.गणपत पारठे-विविध कलांविषयक, 

         या पैकी 4, 5,10, 12, 15, 20 , 21, 24, 27, 29 याठिकाणी निवासव्यवस्था उपलब्ध आहे।











No comments:

Post a Comment