आज बऱ्याच दिवसानंतर मी पोस्ट लिहित आहे. आज निवांत वेळ मिळाला म्हणून हा लेखन प्रपंच . आजचे हे पर्यटन स्थळ पाहून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. त्याची आठवण अजूनही ताजी आहे. साधारण दुपारी एक वाजता मी श्रीशैल्य येथे महादेवाचे दर्शन घेतले. त्यानंतर मी नंद्याळ कडे निघालो. जाईपर्यंत माझी हीच समजूत होती की ,नंद्याळ व महानंदी हे एकच ठिकाण आहे .पण तिथे गेल्यावर कळले की ,हे दोन्ही वेगवेगळे आहेत .
जेवण करेपर्यंत श्रीशैल्यम मध्ये तीन वाजले होते. त्यानंतर श्रीशैल्यम चा घाट अजून उतरायचा होता. मनात एक किंचितशी धाकधूक होती. नवीन रस्ता तसेच घाट पण अवघड होता. असे मोठे घाट उतरण्याची किंवा चढण्याची माझी मनाची तसेच गाडीची दोन्हीची ची तयारी नव्हती. पण आता हळूहळू उतरावे लागणार होते . थोडा उसासा घेतला. मनाला म्हटले ,"ऑल इज वेल".
लगेच गाडीचा स्टार्टर मारला. तिथून निघालो ते थेट नंद्याळ मधेच गाडी उभी केली. तिथे एका टपरीवर चहा घेतला. मग मात्र मला बरे वाटले कारण ,वाटेत निसर्ग हा दहा दहा मिनिटाला नवा अवतार दाखवत होता. चहा झाल्यावर मग मी विचारपूस सुरु केली . इथे मोठा नंदी कुठे आहे ? मग उत्तर मिळाले की, येथे एकूण नऊ नंदी आहेत. तुम्ही कोठे जाणार ? झाली का पंचाईत! यासाठी आपण कुठे जाणार याची संपूर्ण माहिती हवी. पण सोबत भाऊ होता. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला सर्व माहिती होती. पण तिथे गेल्यावर वेगळीच परिस्थिती!
मग चहावाल्याला विचारले की, महानंदी किंवा येथे मोठा साधारण 20 ते 25 फूट उंचीचा नंदी आहे का? मग तो हसला आणि म्हणाला इथून वीस किमी अंतरावर महानंदी नावाचे छोटेसे गाव आहे तिथे जावा. आणि हो लवकर जावा कारण,आता 7 वाजले आहेत. रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य असूं शकतो. तसेच गेल्यावर पटकन मुक्कामाची व्यवस्था पाहून घ्या,नाहीतर तिथे मुक्काम होणे अवघडच आहे.मग थोडीशी भीत भीतच आम्ही निघालो.त्या चहावाल्याने सांगीतले तशी आमची एकच गाडी त्या रोडने जात होती आणि संपूर्णपणे सभोवती काळोख पडला होता.रस्ता अनोळखी होता. शिवाय खूप भूक लागलेली होती.वीस किलोमीटर जायला कधी नव्हे तो मला एक तास लागला.त्याच वेळी एका वळणावर माझा रस्ता चुकला.कळले सुद्धा पाच किलोमीटर पुढे गेल्यावर ! पाच किलोमीटर पुढे गेल्यानंतर एका टपरीवजा छोटेसे हॉटेल होत.तिथे चौकशी केली.त्यांनी पुढे आल्याचे सांगितले. मग मात्र माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला.अजून पाच कीमी मागे जायचे ! आधीच खूप अंधार होता. रस्त्याने माझी एकच गाडी आणि अजून मागे जायचे म्हणजे खूपच त्रास दायक होते.पण गेल्या शिवाय गत्यंतर नव्हते. त्याच हॉटेल वाल्याला येथे मुक्कामाची सोय आहे का ?असे विचारले असता , त्यांनी महानंदी ला किंवा नंद्याल ला जाण्यास सांगितले.मग मात्र माझी भटकंती करण्याची हाऊस फिटते की काय ! अशी स्थिती झाली होती.
त्यानंतर मी गाडी दिली भावाकडे आणि झालो वाटाड्या ! त्यांनी हळूहळू गाडी वळणा पर्यंत आणली . तिथून मग आत गेलो फक्त एकच की मी ! हेही विशेष होते . तोपर्यंत रात्रीचे दहा वाजले होते.
आत जाताच प्रथम दर्शन झाले ते मुक्काम वाले एजंट चे ! एक दोन नव्हे चक्क पाच-सहाजण टोळके करून उभी होती . त्यांच्या तावडीतून सुटणे शक्य नव्हते . मग थोडस विचारपूस केली. प्रत्येकाचा रेट वेगळा होता. मी मात्र समोर दिसणाऱ्या हॉटेलचा आधार घ्यायचे ठरवले . मी यांना नाही म्हणून सांगितले . नेहमीच्या पद्धतीत रूम मिळणार नाही, कुठेतरी फसाल, ज्यादा पैसे जातील असे वाक्य ऐकले . मी मात्र दुर्लक्ष करणेच पसंत केले. लगेच समोर असलेले हॉटेल जवळ केले .
हॉटेल म्हणजे हॉटेल नसून एक मोठी टपरी होती. पण म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार ! गेल्यागेल्या पहिले तर तिथे तो गरम भजी काढत होता . आधीची भजी घेतली . मग जवळची डब्यातली काढले . तसे त्याने गरम वडे हवेत का विचारले. मला वाटले दोन-तीन तास आधीचे असतील . म्हणून माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे होते . पण ते पाहून तो म्हणाला साहेब फक्त भाजी तयार आहे तुम्हाला हवे असतील तर गरम तयार करून देतो .एकूण दहा ते बारा होतील मग मीही आनंदानं तयार झालो. त्यानंतर थोडी विचारपूस केली तर तो म्हणाला आमच्याकडे भजी वडे यासारख्या पदार्थांना मागणी नसते . वरून कोण आले तरच लागतात . नाहीतर इडली द्वाशी उताप्पा या वरच भागते. वरून म्हणजे महाराष्ट्र गुजरात मधून असे त्याला म्हणायचे होते हे मला नंतर कळले.
मग मी सरळ विषयाला हात घातला कोठे मुक्कामाची सोय होईल का? विचारले . तसा तो म्हणाला आंध्रप्रदेश चे पर्यटक संकुल आहे . तसेच टी टी डी चे भक्तनिवास आहे .तसेच इतर खाजगी सोयी पण आहेत . अगोदर ते दोन आधी मिळतात का ते पहा ,असे सुचवले . मग आम्ही आधी आंध्रप्रदेशचे पर्यटक संकुल कडे निघालो. चालत दहा मिनिटाचा तिथे पोचलो. तर ते फुल निघाले .मग गाडी निघाली भक्तनिवास संकुल कडे . जाताना मन धाकधूक करत होते . हे जर फुल्ल असेल तर आधी भेटलेल्या खाजगी उंटाचे पाय धरावे लागतात की काय ? पण नशीब बलवत्तर होते .तिथे पाच रूम शिल्लक होत्या . पाचही पाहून एक पसंद केली . गाडी पार्किंगला लावली .सर्वजण दिवसभराच्या त्रासामुळे पटकन झोपी गेले .
सकाळी उठल्याबरोबर आधी हे भक्तनिवास न्याहाळाय चे काम केले . चांगली दोन मजली इमारत होती! एकूण खालच्या मजल्यावर 15 खोल्या वरच्या मजल्यावर 15 खोल्या असे तीस रूमचे संकुल होते ते. या ठिकाणी एक कमतरता जाणवली ती म्हणजे बाथरूम टॉयलेट सर्वांना कॉमन होते. मग सर्वांना उठवले. तासाभरात सर्व जण तयार झाले .आम्ही लगेच महानंदी मंदिर पाहण्यास निघालो. जवळच दहा मिनिटांच्या अंतरावर मंदिर ! आत जाताना खूप मोठ्या कमानीतून प्रवेश करावा लागला .कमानी वरील नक्षीकाम अतिशय कोरीव होते. आत पादत्राणे स्टँडला लावली .सरळ आत गेलो .आतमध्ये तीन कुंड होते . या कुंडाचे पाणी काचेसारखे पांढरेशुभ्र होते .असे शुद्ध पाणी पाहून मन प्रसन्न झाले.
मुख्य मंदिराभोवती तीन कुंड होते. पहिला ब्रह्मकुंड , दुसऱ्या विष्णू कुंड आणि तिसरे रुद्र कुंड .पण तिसरे कुंड मंदिरात होते .या कुंडात येणारे पाणी आतील महादेवाच्या पिंडी खालून येणारे होते.
या कुंडाची रचना अद्भुत होती . या तीनही कुंडात तर पाच फुटांपर्यंत पाणी राहू शकत होते .जर पाणी पातळी जास्त होत असेल , तर बाजूला असलेल्या दगडी पाइपातून बाहेर जात होते .त्यामुळे ते पाणी वाहत जाऊन पाणी पातळी पाच फुटांपर्यंत होत होती.
हे मंदिर साधारण सातव्या शतकात बांधलेले होते. त्या बांधलेल्या दिवसापासून हे पाणी आज पर्यंत वाहत होते. यात कधीही खंड पडला नव्हता हे विशेष!
मंदिरात दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. साधारण एका तासात दर्शन झाले. बाहेर येताच एक गोष्ट जाणवली की मन खूप शांत झाली आहे . चिंता संपल्यासारखे वाटले. तसेच प्रवासाची काळजीही केव्हाच निघून गेली ती कळली नाही ! बाहेर येताच वेगवेगळ्या आकाराच्या गणपतीच्या एकूण नऊ मुर्त्या दिसल्या . नुकत्याच नवीन रंगात रंगवले असे वाटले . तिथे छान फोटो काढले आणि मग रात्रीच्या हॉटेल वाल्या कडे नष्ट केला . आम्ही तिरुपती चाललो असे त्याला सांगितले. त्याला एक गोष्ट विचारली की आम्ही येथे खूप मोठा नंदी पाहण्यासाठी आलो होतो ,पण इथे तर महादेवाचे मंदिर पाहायला मिळाले .त्यावर तो म्हणाला येथून पाचशे मीटर अंतरावर नंदी पार्क आहे.तिथे तो नंदी आहे.
मग आम्ही नंदी पार्क कडे निघालो. येथील नंदी पाहून खरोखरच आश्चर्यचकित झालो! साधारण तीस फूट उंचीचा होता ! चांगल्या बसलेल्या अवस्थेतील होता. पुढील दोन पाय अगदी रुबाबात दुमडलेले होते. मान सरळ व डोळे आपल्याकडे पाहात आहेत असे होते. त्याचे रंग काम अतिशय उत्कृष्ट होते . नंदी पार्कचे मधोमध हा नंदी होता. या पार्कला संपूर्णपणे कंपाऊंड होते . अतिशय रुबाबदार ,आकर्षक ,मनमोहक ,सुंदर, सगळ्यात उंच नंदी पाहून मन उल्हसित झाले . येथे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे .परंतु आतील परवानाधारक कॅमेऱ्याला मात्र परवानगी आहे. मी मात्र बाहेरून फोटो काढणे पसंत केले. त्यानंतर मी तिरुपती कडे निघालो.

No comments:
Post a Comment