Saturday, December 21, 2019

छाया सोमेश्वर मंदिर,नालगोंडा,तेलंगणा

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

                          रहस्य भाग 2
           छाया सोमेश्वर मंदिर,नालगोंडा,तेलंगणा।
===+====+====+====+=======+====
या दुसऱ्या भागात मी तुम्हांला तेलंगणा राज्यातील नालगोंडा येथील छाया सोमेश्वर मंदिर येथे नेणार आहे।
        नावाप्रमाणेच हे मंदिर भगवान महादेवाचे आहे। याची आख्यायिका मध्ये एकदा भगवान शंकर व देवी पार्वती मध्ये खूप जोराचे भांडण झाले। त्यामुळे भगवान कैलाश पर्वत सोडून नालगोंडा येथे आले। थोड्या वेळाने देवी पार्वती त्यांना शोधत शोधत येथे आली। मग भगवान शंकरानी तिला आपल्या मागे सावली म्हणून जागा दिली।
          या मंदिरात देवी पार्वती सावलीच्या रुपात भगवान महादेव सोबत आहे। दिवसभर या पिंडीची सावली मागे भिंतीवर बरोबर मध्ये असते। आता तुम्ही म्हणाल की एखादा खांब मध्ये येत असेल की!
            मग ही आख्यायिका तयारच झाली नसती। देवाची मुर्ती व सूर्यप्रकाश मध्ये कोणताही खांब नाही। तरीपण ही मुर्ती ची सावली आहे। या मूर्तीच्या गाभारा मध्ये कायम अंधार असतो। त्यामुळे ही सावली स्पष्ट दिसते।तसेच ती सावली दिवसभर हलत नाही, हेही आजून एक वैशिष्ट्य!!!
           आता काहीजण दर्शन मंडप मधील प्रत्येक खांबाजवळ जाऊन आपली सावली आत येते का ते तपासून पाहतात। पण ती सर्व मेहनत वाया जाते। हे मंदिर साधारण 800 वर्ष्या पूर्वी बांधलेले आहे। हे बांधकाम चोल साम्राज्यात झालेची नोंद आढळते। मग 800 वर्षेपूर्वी हा चमत्कार कसा काय घडू शकतो। त्यावेळचे बांधकाम शास्त्र आजच्या पेक्ष्या प्रगत होते काय??
       उत्तर आहे हो नक्की ते प्रगत होते। कारण येथे जरी आख्यायिका असली तरी त्यामागे नक्की विज्ञान होते।त्यावेळी असलेले लोक प्रगत होते। फक्त त्यांचे ज्ञान आपल्या पर्यत पोचले नाही, हीच खरी शोकांतिका!!!
                  या सावलीचे रहस्य शोधून काढले होते ते भौतिक शास्त्रज्ञ मनोहर शेषगिरी यांनी। या सावलीसाठी एकूण चार खांब जबाबदार आहेत।
         यांनी सावली साठी दोन प्रकार मानले आहेत। पहिला प्रकार सरळ सूर्यप्रकाश एखाद्या वस्तूवर पडला असता तयार होणारी छाया । ही छाया हलणारी असते। हलणारी म्हणजे जसा सूर्य आपली जागा बदलेल तशी सावली पण आपली जागा बदलते। सकाळी सावली पश्चिम दिशेला असेल तर संध्याकाळी सावली पूर्व दिशेला।
          दुसरी छाया ही सूर्यप्रकाश च्या विकिरणा ने पडते। पण ही सावली आपली जागा बदलत नाही। कारण सूर्यप्रकाश किरण सरळ वस्तू ला अडत नाहीत। तर त्यांचे विकिरण होते। मगच वस्तू ला अडून त्याची छाया निर्मिती होते। सावली तयार होते। मग सूर्य कोणत्याही दिशेला असो। वस्तू ची छाया जागची हलत नाही। हाच धागा पकडून याची उकल झाली आहे।

मी घरी काढलेली आकृती। शास्त्रज्ञ मनोहर यांनी ही सुचवलेली आहे। मी फक्त drawing काम केले।


वरील आकृतीत मोठे ठिपके हे मंदिरातील खांब आहेत। पहिला किरणचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, सर्वात कडेच्या खांबांची सावली आतील दोन खांबावर पडते। आणि त्या दोन खांबांची बरोबर मध्ये गाभाऱ्यात पडते। अश्या प्रकारे पहिली सावली तयार होते। आता दुसरा किरणा मुळे एक खांबांची सावली शेवटच्या खांबावर पडते। त्याची सावली गाभाऱ्यात पडते।  अश्याप्रकारे ती सावली दोन वेगवेगळ्या खांबांची आहे।आपण ज्यावेळी एक खांबाचा विचार करून सावली अडविण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी दुसऱ्या खांब आपले काम चोख बजावतो। व सावली जशी आहे तशीच राहते।
               आता शेवटचा प्रश्न ही सावली नाहीशी कशी होईल?? याची उत्तर वरील आकृतीतच आहे। आपल्याला ते दोन किरण बंद करावे लागतील। म्हणजे सावली नाहीशी होईल।
                 आता मंदिर कडे जाऊ। आपल्याला ते दोन किरण व तो खांब पहावा लागेल।






वरील दोन फोटोत आपल्याला ते दोन खांब व आत येणार प्रकाश दिसेल।आत कशी सावली आहे ते पाहू।

प्रकाश आत आला की सावली नाही दिसत।


मुख्य गाभारा असा दिसतो।


सावली अशी दिसते। जी कधीही बदलत नाही।




वरील तीन फोटोत मुख्य गाभारा , प्रकाश आत आला की नाहीशी होणारी सावली , सावली कशी आहे हे दिसतें।
               आपल्या पूर्वजाना प्रकाशाचे विकिरण 800 वर्ष आगोदर माहीत होते। हा त्याचा पुरावा। किती प्रगत स्थापत्यशास्त्र शास्त्र होते ते !!!

मुख्य मंदिर

आतील सावली अशी छान आहे।

🐋🐋🐋🐋🐳🐳🐳🐳

No comments:

Post a Comment