Saturday, November 30, 2019

भगवान दत्तात्रेय मंदिर,काला डुंगर,कच्छ, गुजरात।

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

                      रहस्य भाग 1

---------------------------------------------------  भगवान दत्तात्रेय मंदिर,काला डुंगर,कच्छ, गुजरात।
======+=+=====××××+==========                 

                       रहस्य भाग 1 हे सदर मी आजपासून लिहण्यास सुरुवात करतो आहे। आपण आपली प्रतिक्रिया नक्की सांगाल ही अपेक्षा व्यक्त करतो।
         गुजरात हे एक संपन्न राज्य आहे। तिथे बनवलेला statue of unity पाहायला आपण नक्की जात असतो।सुरत , बडोदा, अलाहाबाद ही आपली आवडीची ठिकाणे। आता एका नवीन ठिकाणाची त्यात भर घालायला तयार रहा।
         कच्छ हे वाळवंट पाहण्यासाठी काही निवडक पर्यटक जातात। कारण त्यांना काला डुंगर हा पर्वत व तेथील भगवान दत्तात्रेय मंदिर हे माहिती असते। साधारण कच्छ पासून 25 किमी दूर काला डुंगर हा पर्वत  आहे। या पर्वतावरून कच्छ वाळवंट हे विलोभनीय दिसते। या पर्वताच्या माथ्यावर आपले दत्त मंदिर आहे। या मंदिरापर्यंत आपली कार जाते, पण रस्ता अरुंद आहे। जाताना निसर्गाचा आनंद घ्यायला विसरायचं नाही। कारण हाच काय तो हिरवा भाग।
        कार पार्किंग ला लावल्यावर थोड्या पायऱ्या चढल्या की मंदिराचे दर्शन होते। मंदिरात जाण्यासाठी थोड्या पायऱ्या चढून जाव्या लागतील। प्रथम तुम्हाला सभामंडप चे दर्शन होईल। मग मुख्य गाभारा पाहायला मिळेल। तसे हे मंदिर 400 वर्ष जुने आहे ,असे म्हणतात। पण येथील रचना पहिल्या वर तो एक प्रश्न निर्माण करतो। गाभारा हा नवीन पध्दतीच्या सिमेंट कॉलम वर उभा आहे। छताला फारशी कलाकृती नाही। अगदी साधा आहे। खाली छान फारशी आहे । कदाचित ती संगमरवरी असावी।मुख्य गाभारा पण अगदी साधा असाच आहे। असे हे मंदिर। पण हे विश्व प्रसिद्ध आहे हे मात्र नक्की। गुजरात ला भेट देणारे कोणतेही परकीय या मंदिराला नक्की भेटी देतात। जवळच एक सन सेट पॉईंट आहे। हे कच्छ मधील सर्वात उंच पॉईंट आहे। याची उंची 458 मीटर आहे। येथूनच दिसणाऱ्या सूर्यास्त चे शब्दांत करणे जवळजवळ अशक्य आहे। खूप विलोभनीय, सुंदर, मनमोहक, मन प्रसन्न होणारे असते ।
              या मंदिराला भेट देण्याचे हे एकच कारण नाही। दुसरे महत्त्वाचे कारण आहे ,येथील लांडगे। जे तुम्हाला दिवस भरात कोठेही दिसणार नाहीत। अगदी हा काला डुंगर सगळा जरी पालथा घातला तरी! हे या मंदिराकडे दिवसातून फक्त दोनदा येतात। तेही प्रसाद घ्यायला!
       आता तुम्हाला वाटेल , की मांसाहारी प्रसाद असल्यावर ते येणारच। पण हा मांसाहारी नाही तर चक्क शाकाहारी आहे। तेही फोडणीचा भात ! मग लांडगे काय खाणार ?  खाणारच आणि त्यांनी खाईपर्यंत इतर कोणही खाणार नाहीत। अगदी मांजर, कावळे, इतर पक्षी सुद्धा नाही बरं!! त्यांचे झाल्यावर इतरांना परवानगी मिळते। आता तुम्ही म्हणाल हे खोटे आहे। नाही तर खरे आहे। हेच पाहण्यासाठी परदेशी पर्यटक येतात। त्यामुळेच हे मंदिर जगप्रसिध्द झाले आहे। आणि हे काम आजपासून नाहीतर मागील 500 वर्षांपासून अविरत चालू आहे। हेच पाहण्यासाठी आपल्याला तिकडे जायचे आहे।
          दुपारी व संध्याकाळी आरती झाल्यानंतर पुजारी ताटात खिचडी घेऊन लोंग प्रसाद ओटलो या चबूतऱ्यावर जातात। तिथे ती खिचडी ठेवतात। मग हातातलं ताट वाजवत मंदिराकडे येतात। पण येताना मोठमोठ्या ने म्हणतात लो अंग,  लो अंग। या वरूनच त्या चबुतऱ्या चे नाव लोंग प्रसाद ओटलो असे पडले आहे। मग कुत्री, कावळे, चिमणी, मांजर व इतर पक्षी येतात, पण ते त्या खिचडी ला आधी कधीच तोंड लावत नाहीत। थोडा वेळ होताच लांडगे येतात। ती खिचडी खातात। खाताने ते कधिच भांडण करत नाहीत। अगदी शांत पणे खातात। निघून जातात। साधारण पणे त्याची संख्या 40 च्या आसपास असते। मग इतर त्यावर तुटून पडतात। या लांडग्यांनि आजपर्यंत एकाही मनुष्य प्राण्यावर हल्ला केला नाही, हे विशेष। हे आपल्याला अर्थात लांबूनच पाहावे लागते।
             याची आख्यायिका अशी आहे....
    ज्यावेळी भगवान ध्यान लावून बसले होते। त्यावेळी तिथे एक लांडग्यांचा कळप आला होता। तो कळप खूप दिवसापासून उपाशी पोटी होता। जणू काही भगवान दत्तात्रय याची परीक्षा पाहत होता, की आम्हाला वाचवा। मग भगवान यांनी स्वतः शरीरातील मांस कापून त्यांच्यापुढे टाकले।त्यांनीही आवडीने खाल्ले। पण काय आश्चर्य त्याजागी कापलं तिथे नवीन मांस तयार !!! हे रुटीन पुढे बरेच दिवस चालले। आता भगवान तेथून जाणार होते। त्यामुळे त्यांनी एकेदिवशी खिचडी दिली। त्यांनीही आनंदाने खाल्ली। तेव्हा पासून ही परंपरा चालू आहे।

        याठिकाणी येण्याची आणखी काही कारणे.......
1.  भगवान दत्तात्रय यांचे मंदिर आहे। असे म्हणतात स्वतः भगवान दत्तात्रय यांनी इथे वास केलेला आहे।

2. येथील सन सेट पॉइंट होय। कच्छ मधील सर्वात उंच पॉईंट आहे। येथून भारतातील शेवटचा पूल दिसतो।

3. येथून बॉर्डर खूप जवळ आहे। फक्त 70 किमी। येथील दुर्बिणीतून पाहू शकता।

4. दुपारी व संध्याकाळी लांडगे खिचडी खाताना पाहणे अतिशय रोमांचक प्रसंग।

5. आजून एक महत्वाचे, येथील मॅग्नेटिक फील्ड । याठिकाणी आल्यावर याचा अनुभव घ्यायला विसारचे नाही। पर्वत चढताना एका विशिष्ट ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड लागते। त्याठिकाणी आपली कार बंद करायची व आश्चर्य पहायचे। तुमची कार पर्वत चढू लागेल। ते गुरुत्वाकर्षण नियमाच्या विरोधात!!! तेही 20 च्या स्पीड ने। विश्वास नाही, मग स्वतः अनुभव घ्या।

6. शेवटचं .....
      हे आपल्या भारतातील एकमेव ठिकाण आहे जेथून आपण चार बाबी पाहू शकता।
1. जंगल
2. पर्वत
3. वाळवंट
4. आणि समुद्र।

🐋🐋🐋🐳🐳🐳


भगवान दत्तात्रेय मंदिर, काला डुंगर।

खिचडी खाताना लांडगे।

खिचडी ठेवल्यावर पुजारी असे ताट वाजवतात, लो अंग लो अंग असे म्हणतात।

भगवान दत्तात्रेय मूर्ती।

Sunset point. It is about 548 mtrs high from sea level.. highest point in Kutch.

लांडग्यांच्या प्रतीक्षेत इतर 
Image source::: Google photo...

No comments:

Post a Comment