Monday, April 13, 2020

विश्वरूप भगवान विष्णू यांची 64 फूट उंच मूर्ती

 विश्वरूप भगवान विष्णू यांची 64 फूट उंच मूर्ती।
================================

     आज निवांत बातम्या वाचत बसलो होतो। त्यावेळी विश्वरूप भगवान विष्णू यांच्या अदभूत मूर्ती विषयी माहिती मिळाली। मग लागलो आंतरजालात शोधायला।




             एक स्वप्न माणसाला काय करायला लावतं, त्याच्या मूर्तीमंत उदाहरण म्हणजे बेंगलोरची 64 फूट लांबीची मूर्ती होय। भगवान विष्णूंची बेंगलोर मध्ये एकशे आठ फूट उंचीची मूर्ती मी स्थापित करीन,असे स्वप्न तिथल्याच एका रिटायर झालेल्या सरकारी डॉक्टरांनी बघितलेलं होतं। ही गोष्ट आहे सन 2013 सालची।
                   मग प्रश्न तयार झाला अशी उंच मूर्ती कोण तयार करणार? याचे उत्तर मिळाले तमिळनाडू मधील तिरुवन्नामलाई जिल्ह्यात। पण ही मूर्ती 108 फूट उंचीची न होता 64 फूट उंचीची झाली। ही मूर्ती पूर्ण व्हायला डिसेंबर2018 हे साल उजाडले।
               या मूर्तीत भगवान विष्णूंच्या एकूण अकरा अवतारांना दाखवलेलं आहे। या मूर्तीत भगवान विष्णूंना 22 हात दाखवलेले आहेत। तसेच डोक्यावर सात फनांच्या रुपात शेषनाग दाखवलेले आहेत। ही मूर्ती बनवायला कारागिरांना अथक परिश्रमाने पाच वर्षे लागली आहे। या मूर्तीचे वजन तीनशे टन आहे।
               सगळ्यात अवघड बाब म्हणजे ही मूर्ती तिरुवन्नामलाई येथून बेंगलोरला पोहोच करणे होय।यासाठी मुंबईहून 240 टायर असलेले ट्रक मागवण्यात आलेला होता। सगळ्यात अवघड काम म्हणजे ही मूर्ती तयार केल्यानंतर त्या संबंधित ट्रकवर ठेवणे होय।तिरुवन्नामलाई ते बेंगलोर हे अंतर कमीत कमी दोनशे दहा किलोमीटर आहे। तरीसुद्धा ही मूर्ती बेंगलोरला पोचण्यासाठी कमीत कमी पन्नास दिवस लागतील । एवढं किचकट आणि अवघड काम आहे।


                  त्यानंतर मूर्ती काढताना अजून एक समस्या उभी राहीली। जिथून मूर्ती काढायची होती, तिथं भरपूर माती होती आणि नुकताच पाऊस पडलेला होता। त्यामुळे सर्वत्र चिखलाचं साम्राज्य होते। हा ट्रक तिथपर्यंत गेला परंतु तीन दिवसात फक्त तो तीनशे मीटर पुढे सरकला। ह्या तीन दिवसात त्याचे अनेक टायर्स बदलावे लागले।परंतु हे का मुंबईच्या संस्‍थेने हार न मानता चिकाटीने पूर्ण केले। हे काम मुंबईच्या रेशमा सिंग वाहतूक संस्थेने घेतलेले होते । या संस्थेची एकूण 30 ते 40 माणसं अहोरात्र झटत होती।





                  ही मूर्ती बेंगलोर मध्ये यायला सात महिने लागले । अनेकांच्या मते इतकी अवाढव्य मूर्ती येणे शक्यच नव्हते। परंतु मंदिर प्रशासनाने हार मानली नव्हती। ही मूर्ती आणण्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्याला मोठे करण्यात आले। काही ठिकाणी रस्ते नव्याने करण्यात आले। एकूण अंतर तीनशे किलोमीटर होते। सात महिन्याचा कालावधी धरला असता, रोज एक किलोमीटर पेक्षाही कमी अंतर ट्रकने कापले । शेवटचे 400 मीटर पार करण्यासाठी तर पाच दिवस लागले। या 400 मीटर अंतरातील 35 विजेच्या खांबांना इतरत्र हलवले गेले। तीन घरे तोडण्यात आली । काही ठिकाणी रस्ते मोठे करण्यात आले। अनेक ठिकाणी फुटपाथ बदलण्यात आले। शेवटी ही मुर्ती आपल्या मंदिरात पोहोचली।
                  त्यानंतरही हे काम संपलेले नाही । ही मूर्ती स्थापन करण्यासाठी अंदाजे तीन वर्षाचा कालावधी लागेल ,असे सांगण्यात आले होते । ही मूर्ती आपल्याला कोंडा रामास्वामी मंदिर एजीपुर , बेंगलोर येथे पाहण्यास मिळेल।

सर्व माहिती व फोटो आंतरजालतून.....

2 comments:

  1. खूप छान माहिती सर.
    छान वाटल तुम्ही बार्शीचे आहेत.
    Check my profile -
    facebook - andy.T.24

    ReplyDelete
  2. Golden Nugget Casino, Las Vegas, NV, United States - Mapyro
    Golden Nugget Casino is 충주 출장안마 one of the newest casinos in 경상남도 출장마사지 Vegas. The hotel opened in June 2020 and has a nice selection of 문경 출장안마 slot machines, video poker 시흥 출장샵 and  Rating: 4.2 · ‎821 경상남도 출장마사지 reviews

    ReplyDelete