❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄
श्री रावणेश्वर महादेव मंदिर, कोल्हापूर।
===========================€====
नुकताच काजवा महोत्सव पहिला होता। सौच्या म्हणण्याप्रमाणे आजून चार पाच दिवस तरी बार्शीला जायला अवधी होता। मग काय पहायचे ? प्रश्न मोठा होता। आणि विशेष म्हणजे उत्तरही मलाच शोधायचे होते। मग एका मंदिराचे नाव आले पुढे...! रावनेश्वर मंदिर!!!!
नाव ऐकून थोडे आश्चर्य वाटले !!!! पण सुरुवातीला तरी त्यावर विश्वास ठेवायला हवा होता। हे मंदिर याच शहरात होते हे ही नवलच !!! मी याआधी कधीच हे ऐकले नव्हते। विचार करण्यापेक्षा काढली गाडी निघालो मंदिराकडे!!!
मंगळवार पेठ मधील साठमारी की सातमारी गल्ली शोधायची होती। गल्लीचे नाव अजूनही कळलेले नाहीच। प्रत्यक्ष रावनेश्वर मंदिर कोठे हेच विचारले। जाई पर्यंत जुने किंवा दगडी बांधकाम वगैरे असलेले असेल असे वाटले होते। पण " भव्य " या एकाच शब्दात वर्णन करता येईल असे हे होते।
हे मंदिर इतर मंदिरासारखे नाही , हेच याचे वैशिष्ट्य.....!!!
हे मंदिर शिवलिंगाच्या आकाराचे आहे। म्हणजे बाहेरून पाहिले तर मोठे शिवलिंग च्या आत लहान शिवलिंग। मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वारावर शंकराची ध्यानस्थ मूर्ती दिसते। या मूर्ती च्या एका बाजुला मोर व दुसऱ्या बाजूला नंदी आहे। आत जाताच मंदिराच्या वॉल कंपौंड ची डाव्या बाजूच्या भिंतीला पाहून आश्चर्य वाटले। येथे या भिंतीवरती आपणास बारा ज्योतिर्लिंगाची उठाव शिल्पे पहावयास मिळतात।ही शिल्पे पहात येतानाच दोन स्तंभांवरती शृंगी आणि भृंगी हे दोन शिवगण दिसतात। विशेष म्हणजे हे ३ पायांचे असून यातील कुठलाही एक पाय झाकला असता उरलेल्या दोन मध्ये नृत्यमुद्रा दिसते। यातील शृंगीच्या हातात टाळ तर भृंगीच्या हातात विणा आहे। या दोन शिवगणांचे दर्शन घेत आपण मंदिराच्या मुख्य दाराजवळ येतो। तीर्थ दाराच्या दोन बाजूला काचेमध्ये आपणास उजवीकडे विरभद्राचे तर डावीकडे भैरवाचे चित्र दिसते। यातील वीरभद्र म्हणजे भगवान शंकराच्या तमोगुणाचा अंश। याची कहानी पुढीलप्रमाणे ......
सती दाक्षाय हिने प्रजापतीच्या यज्ञासमोर स्वतःचा देह नष्ट करून घेतला। तेंव्हा तो यज्ञ मोडण्यासाठी महादेवानी वीरभद्रला प्रकट केले। तेंव्हा या वीरभद्रने दक्ष प्रजापतीचे मस्तक उडविले । पण नंतर महादेवांनी बकऱ्याचे मस्तक जोडून त्यास जिवंत केले। अर्थातच ऐकीव...!
भैरव हा ब्रम्हदेवाच्या गर्वहरणाने प्रकटलेला अंश असून हा भैरव क्षेत्रपाल म्हणून काम करतो। या ६४ भैरवांचा प्रतिनिधी म्हणून असा एक भैरव इथे चित्रित केला आहे ।
तिथून पुढे येताच आपली नजर जाते ती कोपऱ्यात असणाऱ्या गंगा व गौरी यांच्या मूर्तीकडे। उजव्या बाजूस कमळात बसलेली आणि मगरीचे वाहन असणारी देवी गंगा होय।वरील दोन हातात कमळ, कलश धारण करून खालील दोन हातांनी भक्तास अभय देत आहे।
डावीकडे देवी गौरी वरील उजव्या हातात त्रिशूल, डाव्यात कुंकवाचा करंडा धारण करून विराजमान झाली आहे।
जवळच्या भिंतीवर रावणेश्वर मुर्तीकडे मुख करून नमस्कार केलेली त्रिजटा पहावयास मिळत।
मंदिराच्या गाभाऱ्यातून दर्शन घेऊन बाहेर पडताच वर मोठ्या आकारात महालक्ष्मी , तुळजाभवानी, रेणुकामाता व सप्तशृंगी या साडेतीन शक्तीपीठ देवींच्या फोटो प्रतिमा पहावयास मिळतात।
या प्रतिमांच्या डाव्या बाजूस देवी सीता वाळूचे पिंड तयार करीत असून, या कामात त्यांना राम, लक्ष्मण व हनुमान सहाय्य करीत असलेले उठावदार शिल्प दिसते। हे पाहत आपण लक्ष्मण लिंगाकडे येतो। त्यानंतर आपणास अमरनाथ गुफा, हिमलिंग प्रतिकृती ,तसेच लक्ष्मणनेश्वर आणि गणपतीचे आपणास दर्शन होते।
या मंदिराचे सर्वात अधिकमहत्वाचे वैशिष्ट म्हणजे याचे शिखर होय । या शिखराच्या पूर्वेस भगवान महादेव, देवी पार्वती, गणपती, कार्तिक यांच्या मूर्ती आहेत। म्हणजेच भगवान शिव सहपरिवार सहकुटुंब विराजमान आहेत।
उत्तरेस पाच मुखे असणारी महादेवाची मूर्ती आहे। महादेवाच्या या पंचमुखी रुपालाच सदाशिव असे म्हणतात।
पश्चिम दिशेला भगवान शिव नटेश्वर रुपात आपल्याला दिसतात।
या सर्वापेक्षा मला मला नवल वाटलेले शिल्प दक्षिणेस आहे । ते म्हणजे शिवआराधना करणारा रावण। साधारण दोन तास लागले हे मंदिर बारकाईने पाहायला। तो पर्यंत खिशातील भ्रमणध्वनी वाजला आणि निघालो घरी..........!
🐋🐋🐋🐳🐳🐳

No comments:
Post a Comment