Monday, September 3, 2018

श्री क्षेत्र देहू, पुणे .

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

                  श्री क्षेत्र देहू, पुणे .

=============================

        पुण्यापासून मुंबईकडे जाताना २५ कि. मी. वर देहू हे इंद्रायणी नदीच्या काठावर असलेले लहानसे गाव. वारकरी आणि भक्ती संप्रदायाचे एक मोठे संत - श्री तुकाराम देहू गावी राहत. गाथा आणि अनेक अभंगांच्या रूपात संत तुकाराम महाराज आजही आपल्याला भेटतात. श्री संत तुकाराम महाराज हे श्री विठोबाचे नि:स्सिम भक्त. त्यामुळे प्रत्येक आषाढी एकादशीला संत ज्ञानेश्र्वर महाराजांप्रमाणेच तुकाराम महाराजांचीही पालखी पंढरपूरला जात असते.
        संत तुकाराम महराजांचे जन्मस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला (तुकारामबीज) येथे मोठी यात्रा भरते. त्याच दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केले असे मानतात. विठ्ठल मंदिर, जुने शिवमंदिर, इंद्रायणीचा डोह ही देहूतील बघण्यासारखी ठिकाणे आहेत. जवळच रामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर येथे कोरीव लेणीही आहेत. संत तुकाराम महाराज चिंतनासाठी, साधनेसाठी भंडारा डोंगरावर जात असत. प्रत्येक गुरुवारी व एकादशीच्या दिवशी मंदिरात कीर्तन होते. सध्या दिसणारे मंदिर इ. स. १७२३ मध्ये संत तुकारामांचा सर्वात लहान मुलगा नारायणबाबा यांनी बांधून घेतले अशी नोंद आढळते.









मंदिरात प्रवेश करतानाच प्रथम आपल्याला गरूडावर बसलेले तुकाराम महाराज मुर्ती दिसते . आत विठ्ठल रूक्मिणी मंदिर आहे . तसेच महाराजांचे हस्तलिखीत अभंग पण आहेत .

देहूत आजून एक पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे गाथा मंदिर होय . जिथे गाथा बुडवली त्या जवळ गाथा मंदिर बांधलेले आहे . संपुर्ण गाथा संगमरवरी फरशीवर कोरलेली आहे .आत जाताच प्रथम तुकाराम महाराजांची ७ फूट उंचीची मूर्ती दिसते .

हे मंदिर मी तीन वेळा पाहिले . प्रत्येक वेळी बदल दिसला .

🐋🐋🐋🐳🐳🐳

No comments:

Post a Comment