❄❄❄❄❄❄❄❄❄
बुल टेंपल, बेंगलोर
==================
बुल टेंपल हे बेंगलोर मधील एक प्रसिद्ध मंदिर आहे। या मंदिरालाच बसवन गुडी मंदिर असे म्हणतात। नावाप्रमाणेच हे एका बैलाचे म्हणजेच नंदीचे मंदिर आहे।
हे मंदिर एका बैलाच्या स्मरणार्थ बांधण्यात आले। हा बैल भुईमूगच्या शेंगा खाण्यासाठी शेतात आला होता। पण काही कारणाने तो हिंस्त्र झाला होता।
तसेच दुसऱ्या मान्यते नुसार , विजयनगर साम्राज्याचे राजे केम्पेगौडा यांच्या स्वप्नात नंदी गेला होता व त्याने उंच टेकडीवर मंदिर बांधण्यास सांगितले। त्यानुसार राजे केम्पेगौडा यांनी 1537 साली या मंदिराचे निर्मिती कार्य हाती घेऊन पूर्ण केले। तेथील शेतकऱ्यांमध्ये अशी भावना आहे की, या नंदीची पूजा केल्यास शेतातील धान्य उत्पादन वाढते।
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात येथे खूप मोठी यात्रा असते। आपल्याला जर या मंदिराला भेट द्यायची असेल तर ते दोन महिने उत्तमच स्थिती!!
हे मंदिर एका उंच टेकडी वर आहे। पार्किंग स्थिती चांगली आहे। पण जागा लवकर फुल्ल होते। मी गेलो होतो त्यावेळी पण फुल्ल होते, त्यामुळे मी रोड साइडला कार उभी करून ,धाकधूक मनानेच पायऱ्या चढण्यास सुरुवात केली। साधारण पाच मिनिटानंतर भव्य प्रवेश द्वार दिसले। चप्पल स्टँड ला पादत्राणे सोडली। आत जाताच भव्य नंदी मूर्ती दिसली। सगळा ताण दूर झाल्यासारखे वाटले।ही मूर्ती 15 फूट उंचीची व 20 फूट लांबीची आहे। या मूर्ती भोवती प्रदक्षिणा घालता येते, हेच याचे वैशिष्ट्य आहे। दर्शन घेऊन बाहेर आलो। चप्पल स्टँड जवळ काही खेळणी घेतली। व जवळच असलेल्या गणपती मंदिराकडे निघालो।
🐋🐋🐋🐳🐳🐳

No comments:
Post a Comment