Wednesday, August 1, 2018

बेंगलोर पॅलेस, बेंगलोर।

❄❄❄❄❄❄❄❄❄

          बेंगलोर पॅलेस, बेंगलोर।

=======€=€€=================+==

बरेच दिवस झाले माझ्या कडून लिखाण काही झाले नाही। आज निवांत वेळ मिळाला।
            टिपू सुलतान समर पॅलेस पाहिल्यानंतर, मी बेंगलोर पॅलेस कडे निघालो। 15 मिनिटात मी पॅलेस मध्ये पोचलो। पॅलेस नावाप्रमाणेच हा खूप भव्य दिव्य आहे। प्रवेश करतानाच याच्या भव्यतेची प्रचिती येते। याचे प्रवेश द्वार मात्र तितकेसे भव्य नाही। आत जाताच ह्या पॅलेस ची भव्य आकृती दिसते। पार्किंग तर खूप नाही ,प्रचंड मोठे आहे। एका बाजूला कार लाऊन आम्ही राजवाड्याकडे निघालो। जाता जाता सेल्फी घेण्याचा मोह काही सुटला नाही।







         हा राजवाडा आठशे एकरवर पसरलेला आहे। हा राजवाडा इंग्लंडच्या प्रसिद्ध विंडसर महल सारखा आहे, हे विशेष। हा राजवाडा 45000 स्के फूट वर उभा आहे। त्यावेळी याला 82 वर्ष लागले होते बनवायला!
          आत जाताच प्रथम तिकीट काउंटर कडे गेलो। तिथे तिकीट दर माझ्या अपेक्षे पेक्षा जास्त होता। 250 रुपये प्रत्येकी होता। पत्नीच्या मनाची चलबिचल चालू होती। मी सांगितले सर्वांची तिकिटे घेतली आहेत। मग आश्चर्य झाल्यावाचून राहिले नाही। या तिकिटामध्ये एक मोबाईल सारखा फोन मिळतो। त्यात काही नंबर आहेत। ते नंबर दाबले कि त्या त्या बाबीची माहिती मिळते। एका तिकिटाला एक मोबाईल मिळतो।
               मी तीन तिकिटे घेतली होती, त्यामुळे मला तीन मोबाईल मिळाले। मी, पत्नी व मुलगा अथर्व असे तीन वाटले। माझा मोबाइल मात्र शेवट पर्यंत माझ्या कडे राहिला नाही। तो मुलीने लगेच पळवला। मुलगी तीन वर्षाची असून सुद्धा तिचे ऐकणे त्यावेळी भाग होते। मग निघालो राजवाडा पाहण्यास........!
                प्रथम बाब होती राजा पुतळा। मग मोबाईल वरील एक हे बटन दाबले। सगळी माहिती ऐकली। माझ्यासाठी हे नवीन होते। माहिती एखाद्या गाईड पेक्षा सरस होती। जवजवळ तीन मिनिटे माहिती होती। पायऱ्या चढून वर गेलो असता राजाचा गेस्ट हॉल दिसला। आत जाऊन पाहण्यास मनाई होती। त्यामुळे दोन दरवाज्यातून तो पहिला। 200 वर्ष पूर्वी जसा होता अगदी तसाच आता तो आहे। सर्व खुर्च्या व एक सिंहासन सारखी खुर्ची मन वेधून घेत होती। आरसा हा सिंहाच्या आकृती वर कोरला होता। जणू काय आता मीच राजा आहे असे सांगण्यासाठी.....!
        पुढे गेल्यावर राजकाळीं काढलेले फोटो याची गॅलरी आहे। त्यानंतर आत असलेली बाग व पोहण्याचा छोटा हौद पहिला। हे सर्व पाहिल्यानंतर खाली उतरावे लागते। तेही लाकडी पायऱ्या वरून .....! अजूनही त्या मजबूत आहेत। मग शिकार केलेल्या प्राण्यांची भुसा भरून जतन केलेली धड , पाय व तर अवयव असलेली भिंत आहे। ते पाहून मनात असे वाटते कि हे प्राणी मारले कसे असतील ? त्या नंतर राजघराण्यातील शेवटच्या राजाची खोली आहे। त्यांनी वापरलेल्या खूप वस्तू अजूनही बिनडंकी आहेत। या नंतर राजदरबार लागतो। त्याची नक्षी अगदी आता काढल्या सारखी वाटते। खूप सजवलेला हॉल आहे। जुन्या खुर्च्या अजूनही आहेत। हेच त्याचे वैशिष्ट्य.....! राजसिंहासन पण त्यावेळचे असेल असे मला वाटले नाही। मात्र तो दरबार त्यावेळी जसा भारत असावा तशी मांडणी तिथे होती। अजूनही बऱ्याच बाबी मनात घेऊन मी बाहेर आलो।
            बाहेर येताच माझे लक्ष इमारती भोवती असलेल्या वेली कडे गेले। अशी रचना , कल्पकता मी आजवर कधीही पहिली नाही। वेली या इमारतीभोवती म्हणजे अगदी चिटकून वाढलेल्या होत्या। त्याही एका विशिष्ट आकारात....! खूप मनाला भावले ते चित्र...!
             मग बाहेर जाऊन बाग पहिली । फोटो घेतले। आणि पुढील प्रवासाला मार्गस्थ......

🐋🐋🐋🐳🐳🐳

No comments:

Post a Comment