❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄
*कासचे पठार, सातारा.*
=================
कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणः २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात.अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या
पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे.
कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात.
या पठारावरून असंख्य फुलांच्या सोबतीने दिसणारे आणि फुलांवर पसरणा-या इंद्रधनुषी छटा म्हणजे स्वप्नसृष्टीचा भासच असतो. या पठारावर पावसाळा संपता संपता ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत रानफुले येतात. दर नऊ वर्षानी फुलणारी टोपली कार्वी ही त्यापैकी कास पठाराचे वैशिष्टय़ गणले जाते. येथील वातावरण रंगीबेरंगी असून कधी पांढरा शुभ्र तर कधी लाल, निळा, जांभळी, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांची फुले पर्यटकांच्या डोळय़ांचे पारणे फेडतात.
दरम्यान, शनिवार-रविवार व सुट्टीच्या दिवशी कास पठाराला भेट देण्याची योजना आखणा-या पर्यटकांना गर्दी टाळण्यासाठी आता ऑनलाईन बुकिंगचा आधार घ्यावा लागणार आहे. गर्दी टाळण्यासाठी व वाहनांच्या कोंडीवर उपाययोजना म्हणून सुट्टीच्या दिवशी केवळ अडीच हजार पर्यटकांना या पठारावर प्रवेश दिला जाणार आहे.
🐋🐋🐋🐳🐳🐳

No comments:
Post a Comment