❄❄❄❄❄❄❄❄❄
हल संग्रहालय, बेंगलोर।
============€€€=€====
HAL अर्थात हल हे नाव मला तसे नवीनच आहे। याचे पूर्ण रूप Hindustan Aeronautics Limited असे आहे। हि पूर्ण स्वदेशी कंपनी आहे। हि कंपनी आपल्या देशा करिता लढाऊ विमाने तयार करते। या कंपनीचे मुख्यालय बेंगलोर येथेच आहे।
या पूर्वीचे नाव Hindustan Aircraft Limited असे होते। या कंपनीचे संस्थापक श्री हिराचंद वालचंद होते। त्यांनी हि कंपनी 23 डिसेंबर 1940 रोजी सुरु केली होती। पण काम काही जोरात नव्हते। त्यानंतर एप्रिल 1941 रोजी त्यावेळी असलेल्या ब्रिटिश सरकारने पंचवीस लाख या कंपनीत गुंतवले। मग याचे काम प्रगती पथावर आले। एप्रिल 1942 साली पहिले विमान तयार झाले। विमानाचे नाव होते Harlow PC-5। लगेच 1943 ला हि कंपनी अमेरिकन हवाई दला कडे हस्तांतरित झाली। पण कर्मचारी स्टाफ न बदलल्यामुळे नियंत्रण भारतीय होते। आता मात्र कंपनीचा विस्तार झपाट्याने वाढला। हि 41वा अमेरिकेचा तळ झाला होता। विमानांची दुरुस्ती व निर्मिती होत होती। 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला। या कंपनीची मालकी भारत सरकार कडे आली। आताचे नाव 1964 साली मिळाले।
हि सर्व माहिती मी तिथे जाण्यापूर्वीच मिळवली होती। त्यामुळे मनात एक उत्साह होता। याचे कारण म्हणजे येथे विमानांचे संग्रहालय होते। विमाने जवळून पाहायला मिळणार या कल्पनेनेच मी हर्षभरीत झालो होतो। अगदी दोन फूट जवळून.....!
येथे पोचताच कार पार्किंग करून तिकिटे घेतली। प्रवेशद्वार काही पहिले नाही। पटकन आत गेलो। डाव्या बाजूने आत जाताच पहिले विमान दिसते। मला वाटले तसे काही लांबून ते पाहता येत नव्हते तर अगदी हात लाऊन पहिले। हि सर्व विमाने आपले वायूदल 2000 साला पर्यंत वापरत होते। नंतर याचे संग्रहालय तयार झाले।
पहिले विमान होते MIG 21 फायटर प्लेन। सोनेरी रंगात रंगवलेले अगदी रुबाबदार दिसत होते। त्यानंतर MIRUT हे विमान होते।
पुढे जेट ट्रेनर सितारा हे प्रशिक्षण देणारे विमान होते। याला प्रशिक्षण देताना मर्यादा होत्या। त्यामुळं हे बंद करण्यात आले। त्यापुढे Light Combat Aircraft तेजस होते। याला एकच जेट इंजिन व एकच व्यक्ती आत बसू शकत होती। पुढे लक्ष्य हे पायलट रहित विमान ठेवले होते। त्यापुढे अजित हे विमान डौलदारपणे उभे होते। या विमानाने त्याची सेवा 1977 ते 1991 पर्यंत दिली होती।
त्याच्या जवळच ब्रिटिश प्रकारातले इंग्लिश इलेक्ट्रिक कॅनबेरा हे विमान आहे। हे मध्यम बॉम्ब फेकणारे होते। कॅनबेराची त्यावेळी असलेली दहशत वेगळीच होती। त्याला पहिल्या पिढीतील जेट इंजिन होते। त्यावेळी ते जगात सर्वात उंच जाणारे होते। हे विमान भारता बरोबरच ऑस्ट्रेलिया, अमेरिका व स्पेन हे देश वापरत होते।
वेस्टलँड सी किंग हे हेलिकॉप्टर पूर्ण पणे सुस्थित होते। हे हवाई दलाच्या वेगवेगळ्या वस्तू , सैनिक, धान्य पुरवठा इ. कामासाठी वापरत होते। त्यावेळी भारत व जर्मनी हे दोनच देश वापरत होते। आजून एक मह्त्वाचे हेलिकॉप्टर पहिले ......ध्रुव । जर्मनीच्या सहकार्याने बनवलेले पहिले स्वदेशी हेलिकॉप्टर होते। 1992 साली याने पहिले उड्डाण घेतले होते। हे हेलिकॉप्टर अजूनही वापरात आहे। पण आधुनिक श्रेणीतील। एक मुख्य बाब म्हणजे आपण हे हेलिकॉप्टर निर्यात देखील करतो। तेही नेपाळ व इस्त्राईल या देशाना। त्यानंतर अनेक HPT32 या सारखे ट्रैनी विमाने होती।
पुढे गेल्या नंतरचे दालन होते वेगवेगळ्या इंजिन्सचे। सर्व विमानांची इंजिन्स ...! त्यातील काही चालू देखील होती। सर्व पाहून मन भारावून गेले।
नंतर आभासी सफर होती विमानांची।पण दोन राऊंडची तिकिटे आधीच संपली होती। साधारण 30 मिनिटांचा एक राऊंड असतो। अगोदरच तीन तास विमाने पहिली होती, त्यात आजून दीड दोन तास थांबणे शक्य नव्हते। म्हणून आम्ही आमच्या हॉटेल कडे निघालो।
एक बाब मात्र मनातून नाही गेली। तिथे एक इसरोचे रॉकेट प्रतिमा होती। अगदी हुबेहूब। ती तिथे कशी ? कारण हे संग्रहालय विमानांचे होते।
संग्रहालयात एक फणसाचे झाडपण होते। फोटो काढायचा काही मोह सुटला नाही।
🐋🐋🐋🐳🐳🐳

No comments:
Post a Comment