Saturday, August 25, 2018

श्री प्रतिबालाजी मंदिर, केतकावळे.

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

    *श्री प्रतिबालाजी मंदिर, केतकावळे.*

==========================

नारायणपूर येथील एक मुखी दत्त मंदिर व महादेव मंदिर पहिल्या नंतर पुढचा टप्पा होता, प्रति बालाजी मंदिर, केतकावळे।
                 जेजुरीहून सरळ सासवड गाठले। गावात जायची गरज नव्हती। बाहेर च्या बाहेर कापूर होळला रस्ता होता।
           तसे पहिले तर हे मंदिर पाहण्याची माझी पहिली वेळ नव्हती। पण या वेळेला माझ्या बरोबर आई वडील होते। साधारण 11 वाजता मेन कमानीत प्रवेश झाला। रस्ता पण सिमेंट चा होता। कमान पण छान रंगवलेली होती। पार्किंग ला कार लावली। सरळ दर्शन रांगेत गेलो। जास्त गर्दी नव्हती। अर्ध्या तासात दर्शन झाले। जरा भूक लागली असे वाटले म्हणून देवस्थानचा प्रसाद घेतला।येथील भात वरण वडिलांना खूप आवडले। एक रम्य देवस्थान पाहून आई वडील खुश झाले। याचे समाधान खूप मोठे होते।




              व्यंकटेश्वरा हॅचरीज या उद्योग समूहाचे संस्थापक डॉ. बी. व्ही. राव यांचे तिरुपती हे कुलदैवत. सर्वसामान्य भाविकांना तिरु पतीला जाणं शक्य होत नाही म्हणून पुण्यात बालाजीचं मंदिर उभारावं, अशी त्यांची इच्छा होती. ही इच्छा ते असताना पूर्ण होऊ शकली नाही. पुढे त्यांची मुले व्यंकटेश राव, बालाजी राव व अनुराधा देसाई यांनी ती पूर्ण केली. 
            मंदिरात प्रवेश करतानाच समोर चप्पल स्टँड आहे. मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी नाही. दर्शन रांगेच्या आधीच टोकन देऊन आपले मोबाईल जमा करावे लागतात. संपूर्ण मंदिराला बाहेरून मोठा प्रदशिणा मार्ग आहे. पुरुष व महिलांसाठी अशा दोन रांगा आहेत. मंदिरात प्रवेश करतानाच पायरीवर पाणी सोडलेले आहे. आपोआप पाय स्वच्छ होऊनच भाविक पुढे जातो.
                श्री बालाजी हा विष्णूचा अवतार. बालाजीची मूर्ती ही काळय़ा दगडात घडवली असून कमळावर उभी आहे. मूर्तीचे चार हातात शंख, चक्र , गदा असून एक हात भक्तांना आशीर्वाद देणारा आहे. कानांत सोन्याची कर्णफुलं  आहेत. उभट आकाराचा मुकुट आहे. सोन्याच्या विविध अलंकारांनी मूर्तीला सजविण्यात येतं. दिवसभरात मंदिरात तीन वेळा पूजा केली जाते. मंदिराच्या समोर ध्वजस्तंभ व गरु ड मंदिर आहे.  त्यात विविध देवदेवता आहेत. मंदिराच्या चारही बाजूंना छोटी मंदिरं आहेत. त्यात वेणुगोपालस्वामी, नृसिंह, पद्मावती, सुदर्शनस्वामी, गोदामाता अशा देवता आहेत. मंदिराच्या डावीकडे कुबेर व वराहस्वामी यांची मंदिरं आहेत.
          या नंतर मी कात्रज च्या सर्प उद्याना कडे निघालो.

🐋🐋🐋🐳🐳🐳

No comments:

Post a Comment