Saturday, May 19, 2018

श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर, हंपी।

विरूपाक्ष मंदिर पाहून झाल्यावर लक्ष्मी नरसिंह मंदिर पहिले। हे मंदिर मुख्य रस्ता पासून 400 मीटर आत आहे। त्यामुळे गाडी रोडच्या कडेला उभी करून चालत मंदिरापर्यंत गेलो।

या मंदिराची भरपूर मोडतोड झाली असावी असा माझा अंदाज आहे। कारण या मंदिराला छत नाही। तसेच मुख्य मूर्ती पण बऱ्याच ठिकाणी अपूर्ण आहे। चौकशी करता हे खरे आहे हे जाणवले।

मुख्य मूर्ती नरसिंह देवाची आहे। ती अंदाजे 22 फूट उंच आहे। हि मूर्ती पर्यटकांचे मुख्य आकर्षन आहे। या मूर्तीत भगवान नरसिंह आपल्या शेष नागावर बसलेले आहेत।शेषनाग त्यांच्या डोक्यावर उभा असलेला दिसतो। बारकाईने पाहिल्यास डाव्या हाताजवळ लक्ष्मीची मूर्ती असावी असा अंदाज येतो। सध्या हि लक्ष्मी ची मूर्तीं कमलपुरा संग्रहालयात असल्याचे समजते।

या दोन्ही मुर्त्या एकाच शिळेपासून बनवलेल्या आहेत। मग ती शिळा उचलली कोणी? उभी कशी केली असेल ? असे अनेक प्रश्न माझ्या समोर उभे राहतात। त्याकाळी खरंच एवढे प्रगत तंत्रज्ञान असेल का?
               



 हे मंदिर राजा कृष्णदेवरायच्या काळात इसवी सन 1528 मध्ये बांधले गेले असे शिलालेखावरून समजते। त्यानंतर ह्या मंदिराची मोडतोड 1565 मध्ये झाली असावी असा अंदाज आहे। 290 वर्ष जुनी मूर्ती पाहून मन तृप्त झाले।



No comments:

Post a Comment