Sunday, May 20, 2018

श्री विरूपाक्ष मंदिर, हंपी.



                         हे मंदिर कर्नाटक राज्यात असून बेंगलोर पासून 350 किमी लांब आहे।

                         हंपी हि विजयनगर साम्राजाची राजधानी होती। ती तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर आहे। हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेला आहे।

                        या मंदिराची स्थापना इसवी सन 9 मध्ये केली गेली असा अंदाज आहे। त्यानंतर 10 व 11 व्या शतकात त्याचा विस्तार झाला। 

                       या मंदिराला दोन गोपुरे आहेत। राजा कृष्णदेवरायच्या राज्यअभिषेक वेळी गोपुराची निर्मिती केली गेली। तेही फक्त चुना आणि विटेच्या मदतीने।एकाच वेळी सलग दोन गोपुरे असलेले भारतातील एकमेव मंदिर असेल। मंदिराचे शिखर 50 मी उंच आहे।या मोठया मंदिरात छोटी छोटी अनेक मंदिरे आहेत। हंपीतील अनेक मंदिरांपैकी या मंदिरात आजून पण पूजाअर्चा चालू  आहे। हे मंदिर भगवान शिव व त्यांची पत्नी पम्पा यांना समर्पित आहे। या मंदिरालाच पम्पावती हे दुसरे नाव आहे।हे मंदिर हेमकुटा पर्वताच्या पायथ्याला आहे। चारही बाजूनी पर्वताचे मोठ मोठे दगड पाहून मन खरच घाबरून जाते। जर एखादा दगड निसटला तर.........

                        या मंदिराला स्वतः चा हत्ती आहे। मंदिराच्या मंडपात वेगवेगळे रामायण व महाभारत यातील प्रसंग कोरले आहेत। गाभा मंदिरात जायचे असेल तर 25 रुपये तिकीट आहे। नाहीतर लांबून दर्शन घ्यावे लागते।

                        एक गोष्ट नक्की नमूद करावीशी वाटते कि मंदिरात गार वाटत होते। बाहेर खूपच उष्णता होती।

                         या मंदिराचा समावेश जागतिक वारसा स्थळ यात झालेला आहे।

                       
























मंदिरात साधारण 100 मिनिटे वेळ कसा गेला ते कळलेच नाही। नंतर मी पुढील हंपी येथील स्थळे पाहण्यास निघालो।



No comments:

Post a Comment