हजारा राम मंदिर पासून पुढे गेलो कि हत्तीखाना व कमल महल या दोन इमारती पाहण्यास मिळतात।
प्रथम गाडी पार्किंगला लावली। भरपूर ऊन होते । नुकतीच काही ठिकाणे उन्हात पहिली होती। त्यामुळे तहान खूप लागली होती। प्रथम पाणी पिले भरपूर। समोरच आइसक्रीम चा गाडा होता। आधी सगळ्याना कोन घेतले। मस्त खाल्ले। मगच पुढे चालत निघालो।
थोडे अंतर चालले असता आपल्याला मुख्य प्रवेशद्वार लागते। त्याबाजूला आधी तिकिटे काढावी लागतात। अंदाजे 20 रुपये प्रति मानसी असा दर आहे। तिकिटे घेऊन आत गेलो असता प्रथम राणी महल चबुतरा दिसला। या ठिकाणी महाराणी राहत होती। आता फक्त त्या इमारतीचा पायाच आहे।
थोडे पुढे गेल्यावर कमल महल दिसतो। तो आजही सुस्थितीत आहे। येथे निवांत व गार वाटते। इमारत खूपच सुंदर व प्रेक्षणीय आहे।
कमल महल च्या थोडे पुढे गेले असता निगराणीचा टॉवर दिसतो। येथून सगळीकडे लक्ष ठेवले जात असे। मग कमानीतून आत गेल्यावर आपल्याला अपेक्षित हत्ती खाना दिसतो।
या इमारतीला कोणत्याही प्रकारची अजूनही इजा किंवा धक्का लागलेला दिसला नाही। जुनी आहे तशीच अजूनही डौलात उभी आहे।
या इमारतीला एकूण अकरा घुमट आहेत। काही घुमट एकमेकांना जोडलेले आहेत। मधला घुमट सर्वांत उंच आहे। या हत्ती खाना पाहून त्याकाळी हत्तीना असलेले महत्व लक्ष्यात येते। येथे फक्त शाही हत्ती ठेवण्यात येत होते।
मधला घुमट थोडा वेगळा आहे। त्यावर सुंदर , अप्रतिम नक्षीकाम काम आहे। इतर घुमट मात्र सामान्य आहेत। प्रत्येक हत्तीच्या चेंबर मध्ये मागून एक झरोका आहे। तेथून कदाचित महुत आत येत असावेत। तसेच वर एक हूक पण आहे। तेथून साखळी बांधली जात असावी। एकूण अकरा हत्ती सांभाळणे म्हणजे काय असते त्या काळच्या लोकांनाच माहित !!!
या जवळच एक इमारत आहे । ती जनानखाना आहे असे समजले। त्याची सुरक्षा विशेष सैनिक करत असत अशी माहिती मिळाली।




No comments:
Post a Comment