बेंगलोर मध्ये पर्यटनाची सुरुवात समर पॅलेस
पासून केली। येथे पोचल्यावर पहिली समस्या गाडी पार्किंगची होती। गाडीची थोडी काच खाली करून सिग्नलला शेजारच्या रिक्षावाल्याला विचारले। त्याने चिटकूनच असलेल्या बालाजी मंदिरकडे बोट दाखवले। तसेच रोड वर कडेला उभ्या असलेल्या गाड्या दाखवल्या। मग सिग्नल पडल्यावर गाडी वळवुन रोड टच उभी केली। आणि पॅलेस कडे निघालो।
बाहेर आधी तिकीट काढले। प्रति मानसी 15 रुपये होते। आत जाताना जो रस्ता होता त्याच्या दुतर्फा बाग व लाँन होते। खूप गार वाटले।
या इमारतीची सुरुवात 1778 मध्ये हैदर अली यांनी केली होती। पण पूर्ण केली टिपू सुलतान यांनी 1784 मध्ये। या इमारतीची मुख्य शोभा ही याच्या भोवती असलेली बाग होय।यालाच दरिया-दौलत बाग असेही म्हणतात। या पॅलेसला abode of happiness असेही म्हंटले जाते।
या इमारतीचा पाया हा खडक असून वरील इमारत ही लाकडाची आहे। तीही इमारत दोन मजली आहे हे विशेष !!
आत गेल्यावर प्रथम खूप मोठी रिकामी जागा दिसते। त्याच्या कडेने वर जाण्यास दोन्ही बाजूस पायऱ्या दिसतात। प्रथम आत गेलो। तिथे छोट्या खोल्या आहेत। त्यात वेगवेगळे भाग पाडलेले आहेत। प्रत्येक भागात वेगवेगळी तत्कालीन चित्रे ठेवली आहेत। एक विशेष बाब म्हणजे त्याकाळी असलेले रॉकेट पण तिथे आहे। रॉकेट पाहून मन भरून आहे। मनात विचार आला , किती प्रगत युद्ध साधने होती।
मग बाहेर येऊन वर जाण्यास निघालो। पायऱ्या पण लाकडाच्या होत्या हे विशेष। वर गेल्यावर दोन्ही बाजूने इमारत दिसते। वरचा मजला पण लाकडाचा होता। बाहेरच्या उष्णतेचा अजिबात परिणाम जाणवत नव्हता। खूप बरे वाटले आणि मन प्रसन्न झाले। या इमारतीच्या लाकडाचे निरीक्षण केले तर अजूनही सुस्थितीत होती। मुख्य म्हणजे लाकडी पिलर मजबूत आहेत।
इतकी मजबुती तीपण लाकडाची !!!!
खरेच बांधणारे हात नक्कीच महान होते , असे वाटले। मग बाहेर येऊन बाग पहिली। थोडे फोटो काढले। आणि बाहेर पडलो।
बाहेर येताच मंदिराची आठवण झाली। मग मंदिर पाहण्यास आत गेलो। हे मंदिर बालाजी चे होते। दर्शन घेतले।प्रसाद घेतला। चिटकूनच पद्मावती देवी चे मंदिर होते। तेही पहिले। खूपच आनंदी वाटले। थोडा वेळ मंदिरात बसून चिंतन केले। मगच बाहेर निघालो।

No comments:
Post a Comment