Tuesday, May 22, 2018

शाही राजवाडा, हंपी

क्वीन्स बाथ पाहिल्यानंतर मी शाही राजवाडा












पाहण्यासाठी निघालो।
                  राजवाडा नावाप्रमाणेच भव्य असा असला पाहिजे। आता फक्त अवशेष उरले आहेत।कोणतीहि इमारत शिल्लक नाही। एकेकाळी या राजवाड्यातून विजयनगर साम्राज्याची सगळी सूत्रे हालत असायची। या राजवाड्यात वेगवेगळ्या प्रकारच्या 45 इमारती होत्या। त्यात दरबार भरण्यासाठी सभागृह, वेगवेगळी मंदिरे, राजा-राणी यांचे शाही घरे, गुपचुप बैठक केंद्र, जाहीर सभा केंद्र यांचा समावेश होता। या राजवाड्याला उत्तरे कडून दोन ठिकाणाहून व पश्चिमे कडून एका ठिकाणी अश्या तीन जागी प्रवेशद्वार होते।
                याची रचना विजयनगर पद्धतीची पण मुगल शैलीचा प्रभाव असणारी होती। यातील सर्व इमारती या ग्रॅनाईट दगडपासून बनवलेल्या होत्या। त्यावर सुंदर असे नक्षीकाम होते। काही ठिकाणी फुलांच्या नक्ष्या, काही जागी सिंह व हत्ती तर काही जागी इतर चित्रे कोरलेली होती।
                  मी या राजवाड्यात प्रवेश करताना जे मोठमोठी दगड पहिले ते बघून याच्या भव्यतेची प्रचिती आली। त्यातला एक दगड तर 15 फूट लांब व 10 फूट उंच होता।पायऱ्या चढून वर जाताच महानवी डिब्बा दिसतो। ही एकच इमारत आपले अस्तित्व टिकवून आहे। हि इमारत सर्वांत उंच आहे। याची उंची अंदाजे 100 फूट असेल। याठिकाणी वर जाण्यासाठी दोन ठिकाणाहून पायऱ्या आहेत। समोर जाताच दिसते ती शाही पायरी। खूप सुबक नक्षी काम आहे त्यावर। दुसऱ्या बाजूकडून सामान्य जनता जात असेल । याठिकानाहून दोन प्रकारची कामे चालत असावीत असा माझा अंदाज आहे।
1. येथून न्याय निवडा केला जात असेल
2. येथून सर्व भागावर लक्ष ठेवले जात असेल। तसेच सर्व कवायती, सण, विविध उत्सव येथे बसून पहिला जात असेल।
                  याच्या जवळच खूप मोठा हौद बांधला आहे। त्याची रचना तर डोळयात आजून जशीच्या तशी आहे। हे कॉमन आंघोळीचे ठिकाण आहे। सर्वात महत्वाची बाब म्हणजे याठिकाणी पाणी आणण्यासाठी दगडी पाईप आहेत। आजून ते जसेच्या तसे आहेत। यात पाणी असते तर नक्की अंघोळ केली असती !
                 याच्या जवळच भूमिगत खलबते केंद्र जमिनीखाली बांधलेले आहे। त्याचा बराचसा भाग पडल्याने तो अगदीच अरुंद वाटतो।
               याच्या थोडे पुढे शंभर खांबांचा राजेशाही दरबार सभागृह आहे। त्याच्या फक्त पायऱ्या उरलेल्या आहेत।
               आता पर्यंत उन्हाने घामाच्या धारा लागलेल्या होत्या। आधीच सर्वजण कारमध्ये जाऊन बसले होते। माझे निरीक्षण संपण्याची वाट पाहत होते।मलाही खूप तहान लागल्याने व पाहून सगळे संपल्याने कारकडे निघालो।

No comments:

Post a Comment