बडवलिंग मंदिर पाहून झाल्यावर मी क्वीन्स बाथ पाहण्यास निघालो।
कारसमोरच रसाचा गाडा होता। मोह काही आवरला नाही। दर मात्र दुप्पट होता।सर्वांनी रस घेतला। थोडा आराम वाटला। तसेच उन्हापासून थोड्या वेळ का होईना सुटका झाली।
करचालू करून थेट क्वीन्स बाथ गाठले। बाहेरून इमारत चांगली वाटली। आत जाताना वाटेच्या दोन्ही बाजूस हिरवळ, शोभेची झुडुपे होती। हि इमारत बाहेरून अष्टकोणी आहे। कुठे कुठे इमारतीचा गिलावा केलेला चुना निघाला होता। पण आत गेल्यावर चित्र मात्र वेगळे दिसले।
आत मध्ये एक मोठा हौद होता। त्याच्या भोवती वर्तुळाकार फिरण्यासाठी व्हरांडा सारखी रचना होती। विशेष म्हणजे या व्हरांड्याची रूंदी 10 फूट पेक्षा जास्त होती। ठिकठिकाणी हौद्यात उडी मारण्यासाठी विशेष रचनाच होती। तीही नक्षीदार होती। या हौद्यात पाणी दगडाच्या पाईपमधून येत होते। ती रचना पाहून मन थक्क झाले।
यात त्याकाळी महाराणी स्नान करण्यासाठी येत असत। त्यावेळी हा हौद पाण्यानी भरत। त्या पाण्यात सुगंधी फुले, सुगंधी द्रवे मिसळली असत।त्याकाळचा थाट काही वेगळाच होता याची जाणीव झाली।
एका गोष्टीची नोंद करावीशी वाटते। चुकीची असेल पण महत्वाची आहे। या इमारतीच्या पार्किंग समोर टॉयलेट ची या परिसरातील एकमेव सोय आहे। जाताना सुट्टे पैसे न्यायला विसरायचे नाही।

No comments:
Post a Comment