चार वाजता कार्यक्रम आटोपल्यानंतर मी थोडा सुटकेचा श्वास घेतला। माझा सरळ बार्शीला जायचा काही विचार नव्हता। काय पहावे हे विचार करत असताना शिखरशिंगणापूर सुचले। येथे जाऊन मला सात-आठ वर्ष झाली होती। तरीपण मन वळलेच।
मंदिर आमच्यापासून ५० किमी दूर होते। पण मी ५५ मिनिटात येथे पोचलो। या मंदिराकडे जाण्यासाठी दोन रस्ते आहेत। पहिला अगोदरच लागतो। तो पायथ्याशी जातो। मग पायऱ्या चढून वर जावे लागते। मागे मी गेलो होतो त्यावेळी हाच मार्ग निवडला होता। आता अंगात त्राण नव्हते आणि चालण्याची इच्छा पण नव्हती। त्यामुळे दुसऱ्या मार्गाचा आवलंब केला। सरळ पायरी पासून थोड्या अंतरावर गाडी पार्क केली। आजून पण २५ ते ३० पायऱ्या चढण होती। पायऱ्यांच्या दुतर्फा दुकाने होती। ते विविध वस्तू विक्रीसाठी साद देत होते। मी पण गाडी पार्किंग जवळच्या दुकानात नारळ, दवणा, हार वगैरे घेतले होते। वर जाताच माझी घोर निराशा झाली। मंदिर दर्शन रांग २ तासाची होती। तरीपण मी दर्शनाची आस सोडली नाही।
हे महादेव मंदिर
अनेकांचे कुलदैवत आहे। हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादवकालीन राजा सिंदन याने वसवले असे इतिहासामध्ये सापडते। या मंदिराला दगडी तटबंदी आहे। ती तटबंदी अजूनही खूपच भक्कम आहे। येथील जुने मंदिर पडल्याने आताचे नवीन बांधले गेले असे समजते। मला आवडलेली बाब म्हणजे याचे शिखर होय। अप्रतिम ,कोरीवकाम व नक्षीकाम या मंदिराच्या शिखरावर आहे। तसेच रंगसंगती पण मनाला मोहून टाकणारी आहे। तीन दिवस तरी हे नक्षीकाम पाठ सोडेल असे वाटत नाही। जेथून रांग चालू होते त्याजवळच नवीन सुबक प्रवेशद्वार नवीन बांधले आहे।
हळूहळू रांग पुढे सरकत होती। २ तासांनी मी मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला। हा सभा मंडप व घृष्णेश्वर चा मंडप अगदी सारखे वाटले। काहीच फरक नव्हता। दगडी खांबावर सुबक नक्षी काढलेली होती। थोडे पुढे गेल्यावर मंडपातील नंदी दिसले। तेही पाच नंदी होते। सर्वाना पितळी पत्रा लावलेला होता। हे दृश्य खूपच विलोभनीय होते। आत जाताच मुख्य मूर्ती दिसली। त्यावर काळ्या पाषाणाची सुबक मूर्ती होती। पाहून मन भारावून गेले। दर्शन घेऊन मी बाहेर पडलो।

No comments:
Post a Comment